Water Project Agrowon
ॲग्रो विशेष

Water Project : तापी, गिरणावरील प्रकल्प तीन दशकांपासून अपूर्णच

Team Agrowon

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातून तापी आणि गिरणा या प्रमुख नद्या वाहतात. मात्र त्या नद्यांवरील प्रकल्प २५ ते ३० वर्षांपासून प्रलंबित असल्याने जिल्ह्याला सिंचनाच्या दृष्टीने जो लाभ व्हायला हवा होता, तो होताना दिसत नाही.

प्रकल्प अपूर्णावस्थतेत असल्याने गेल्या पावसात तब्बल ४ टीएमसी पाणी जिल्ह्यातून गुजरातेत वाहून गेले. त्यामुळे वर्षानुवर्षे निधीअभावी रखडलेले प्रकल्प केव्हा पूर्णत्वास येतील, हा खरा प्रश्‍न आहे.

जळगाव जिल्ह्यातून तापी व गिरणा या दोन प्रमुख नद्या वाहतात. गिरणा नदीवर नाशिक जिल्ह्यात गिरणा धरण आहे, तर तापीवर हतनूर प्रकल्प आहे. ते भरल्यावर पुढे कुठेच पाणी अडविण्याची सोय नसल्याने ‘ओव्हर फ्लो’ होणारे पाणी दरवर्षी वाया जात असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, गतवर्षी जळगाव जिल्ह्यातून जून ते ऑक्टोबरपर्यंत तब्बल ११ हजार ४११ दलघमी एवढे पाणी जिल्ह्याची सीमा ओलांडून गेल्याचे पाण्याच्या आकडेवारीवरून समोर आले आहे.

‘बलून’ला हवा राज्याचा निधी

गिरणा नदीवरील बलून बंधाऱ्याचा प्रश्‍न ३० वर्षांपासून रखडला आहे. गिरणेवरील ७ बलून बंधाऱ्यांना भाजप -सेनेच्या युती शासनाने २०१९ ला प्रशासकीय मान्यता दिली. मात्र त्यात पूर्ण निधी हा केंद्र शासनाने द्यावा, अशी अट टाकण्यात आली होती.

त्यानंतर पर्यावरण मान्यता, गुंतवणूक यात बराच वेळ गेला. शिवाय, प्रकल्पात राज्याचाही निधी हवा, असे सांगण्यात आले. प्रस्ताव राज्य शासनाच्या कोर्टात आलेला आहे.

शेळगाव बॅरेजचे पाणी शेतापर्यंत न्या

शेळगाव प्रकल्पाला ही १९९७-९८ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली. मात्र तो पूर्णत्वास यायला तब्बल २५ वर्षे लागली. सद्य:स्थितीत प्रकल्पात ३० टक्के पाणी अडविण्यात आले आहे. पुढच्या वर्षी पूर्ण क्षमतेने पाणी अडविले जाणार आहे.

मात्र या पाण्याचा प्रत्यक्ष सिंचनासाठी फायदा होणार नाही. कारण अद्याप उपसा सिंचन योजनेला मंजुरी मिळालेली नाही. राज्य शासनाकडून मंजुरीची प्रतीक्षा आहे. या प्रकल्पाच्या माध्यमाने ११ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Upsa Irrigation Scheme : परभणी, मानवत तालुक्यांत उपसा सिंचन योजना प्रस्तावित

Bullet Train : बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुसाट

Crop Loan : पीककर्ज वाटपप्रकरणी दाखल गुन्हे मागे घ्या

Panchganga Sugar Factory : पंचगंगा साखर कारखान्याच्या वार्षिक सभेला गालबोट, कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी

Electricity Bill Waive : कोल्हापुरातील पाणी संस्थांना वीजबिल माफीची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT