Mulshi Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Irrigation : ‘मुळशी’तील वाया जाणारे पाणी कृष्णा खोऱ्यातील शेतकऱ्यांना द्या

Mulshi Dam Water Management : मुळशी धरणातील पाण्याच्या वीजनिर्मितीनंतर बरेचशे पाणी वाया जाते,. पण हे पाणी वाया जाऊ न देता, ते शेतीसाठी द्यावे अशी मागणी आमदार राजन पाटील यांनी केली आहे.

Team Agrowon

Solapur News : मुळशी धरणाच्या पाण्यावर टाटा समूहाकडून वीज प्रकल्प सुरु आहे. पण येथे वीजनिर्मितीनंतर बरेचशे पाणी वाया जाते, ते समुद्राला जाऊन मिळते. पण हे पाणी वाया जाऊ न देता, ते पाणी कृष्णा खोऱ्याचे असून, आमच्या शेतकऱ्यांच्या हक्काचे आहे, ते शेतीसाठी द्यावे, अशी मागणी मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनी केली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना माजी आमदार पाटील म्हणाले, उजनी धरणाच्या बॅक वॉटरच्या कडेने ४२० किलोमीटर अंतर आहे. त्या परिसरातील शेतकऱ्यांसाठी साडेचार टीएमसी पाणी राखीव ठेवले होते. पूर्वी फक्त सिमेंटच्या पाईपच्या माध्यमातूनच पाणी उचलले जात होते.

मात्र सध्याच्या नवीन टेक्नॉलॉजीच्या माध्यमाद्वारे पीव्हीसी पाईप व जादा अश्‍वशक्तीच्या मोटारीच्या माध्यमातून तेच पाणी नऊ टीएमसी उचलले जात आहे. दरम्यान मूळ उजनी प्रकल्पामधील लाभधारक शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाने काढून घेतल्या आहेत. ज्या आहेत त्यांना त्या पटीत पाणी मिळत नाही. त्यामुळे त्यांच्यावर हा मोठा झालेला अन्याय आहे.

तसेच अलीकडे पर्जन्यमान ही कमी झाले आहे. त्याचाही फटका शेतकऱ्यांना बसत आहे. पुणे जिल्ह्यातील मुळशी धरण हे ४० टीएमसी पाणी साठवण क्षमतेचे आहे. त्या ठिकाणी टाटा उद्योग समूहाकडून राज्य सरकारच्या करारानुसार प्रकल्पाच्या माध्यमातून वीज निर्मितीचा करार झाला होता, परंतु तो करार आता संपला आहे.

मात्र वीज निर्मिती झाल्यावर त्यातून वाया जाणारे पाणी हे समुद्राला जाऊन मिळते ते पाणी कृष्णा खोऱ्यातील आहे, त्यामुळे ते पाणी शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे, अशी आग्रही मागणी माजी आमदार पाटील यांनी केली आहे.

दरम्यान, सध्या अपारंपरिक ऊर्जा व सौरऊर्जा पॅनलद्वारे ऊर्जा निर्मितीसाठी मोठा वाव आहे. त्या माध्यमातून वीज निर्मिती करावी व विजेचा बॅकलॉग भरून काढावा, अशी मागणीही माजी आमदार पाटील यांनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election : शेतकरी संघटनांना भुलवतेय आमदारकीची मोहमाया

Maharashtra Assembly Election : पुणे जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाची ससेहोलपट

Sanjay Kulkarni Death : ‘जलसंपदा’ला दिशा देणारे संजय कुलकर्णी यांचे निधन

Rabi Crop Loan : रब्बीसाठी पीक कर्जाचे ६८५ कोटींचे उद्दिष्ट

Maharashtra Weather : मध्य महाराष्ट्रात थंडीची चाहूल

SCROLL FOR NEXT