Maharashtra Drought : दुष्काळी मदतीसाठी सहा तालुक्यांचा प्रस्ताव

Drought Condition : काही तालुके दुष्काळापासून दूर राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांना दुष्काळी मदत मिळावी म्हणून तहसीलदारांकडून अहवाल मागविले आहेत.
Maharashtra Drought Condition
Maharashtra Drought ConditionAgrowon

Solapur News : मोहोळ, पंढरपूर, दक्षिण सोलापूर व मंगळवेढ्यातील दुष्काळजन्य स्थितीमुळे ट्रिगर-एक लागू झाला होता. पण, सॅटेलाईट सर्व्हेनंतर हे तालुके ट्रिगर-दोनमधून वगळले. दुसरीकडे उत्तर सोलापूर, अक्कलकोट हे तालुके दुष्काळापासून दूरच राहिले.

या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांना दुष्काळी मदत मिळावी म्हणून तहसीलदारांकडून अहवाल मागविले आहेत. आता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडून तालुकानिहाय सविस्तर आकडेवारी घेऊन मदतीचा प्रस्ताव सरकारला पाठविला जाणार आहे.

तीव्र दुष्काळाची स्थिती, पावसात तीन ते चार आठवड्यांपेक्षा जास्त खंड, तापमानातील घट किंवा वाढ, पावसाचे असमान प्रमाण, पिकांवर कीड, रोगाचा प्रादुर्भाव व एकूण पेरणीच्या २५ टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्र बाधित, या निकषांच्या आधारे शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळते.

Maharashtra Drought Condition
Directorate of Marketing : ‘पणन’च्या आदेशाला व्यापाऱ्यांकडून केराची टोपली

या निकषांनुसार सोलापूर जिल्ह्यातील ९२ महसूल मंडळांमधील शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याची बाब समोर आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढल्यानंतर ३० दिवसांत पहिल्या टप्प्यात एकूण विमा संरक्षित रकमेतील २५ टक्के रक्कम बाधित शेतकऱ्यांना देणे बंधनकारक आहे.

मात्र विमा कंपनीने काहीतरी त्रुटी काढली आणि १५ सप्टेंबरपासून अद्याप शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळालेली नाही. आज (मंगळवारी) त्यासंदर्भात कृषी आयुक्तालयात विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक पार पडली.

Maharashtra Drought Condition
Drought Condition : संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा ; रोहित पवारांनी घेतली विभागीय आयुक्तांची भेट

त्यानुसार आता काही दिवसांत बाधितांना भरपाईची २५ टक्के रक्कम मिळेल, असा विश्वास कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, एकीकडे खरीप विम्याची रक्कम नाही, रब्बीची पेरणी कमी, उजनी धरणासह मध्यम प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा नाही, अशी स्थिती आहे. तरीपण, सहा तालुके दुष्काळाच्या यादीतून बाहेर पडल्याची स्थिती आहे.

खरिपातील ५० टक्क्यांहून जास्त नुकसान

तालुका महसूल मंडळ

द.सोलापूर निंबर्गी (तूर व बाजरी)

पंढरपूर कासेगाव, खर्डी (तूर)

मंगळवेढा मंगळवेढा, पाटखळ (तूर, कापूस व बाजरी)

माळशिरस माळशिरस, खुडूस (तूर, बाजरी, भुईमूग, कांदा)

सांगोला महूद, कोळा, जवळा, घेरडी, शिवणे (बाजरी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com