Ramesh Bais Agrowon
ॲग्रो विशेष

Water Management : पाणी व्यवस्थापनाला सर्वोच्च प्राधान्य हवे

Water Conservation : वाढती लोकसंख्या आणि विशेषतः मराठवाड्यातील खालावत असलेली भूजल पातळी लक्षात घेऊन पाणी व्यवस्थापन विषयाला सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज आहे.

माणिक रासवे

Parbhani News : वाढती लोकसंख्या आणि विशेषतः मराठवाड्यातील खालावत असलेली भूजल पातळी लक्षात घेऊन पाणी व्यवस्थापन विषयाला सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज आहे. जलसंवर्धन, पाणलोट विकास, पावसाच्या पाण्याची साठवणूक आणि पाण्याच्या पुनर्चक्रनासाठी समग्र जल व्यवस्थापन योजना तयार करावी.

शेतीच्या सक्षमीकरणासाठी सर्वोत्तम गुणवत्ता असलेले बियाणे विकसित करण्यावर देखील लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन राज्यपाल तथा विद्यापीठांचे कुलपती रमेश बैंस यांनी केले.

मंगळवारी (ता. १९) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या (Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth) २५ व्या दीक्षान्त समारंभाचे अध्यक्षस्थान श्री. बैस यांनी भूषविले. यावेळी दूरदृश्‍य प्रणालीद्वारे ते बोलत होते. कृषी विद्यापीठातील सुवर्ण जयंती दीक्षान्त सभागृहात आयोजित समारंभामध्ये भारतीय कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाचे अध्यक्ष डॉ. संजय कुमार यांचे दीक्षान्त भाषण झाले.

कुलगुरू डॉ. इंद्र मणी, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख (Panjabrao Deshmukh) कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, नागपूर येथील महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील, ‘वनामकृवि’चे माजी कुलगुरू डॉ. चारुदत्त मायी, डॉ. किशनराव गोरे, डॉ. बी. व्यंकटेश्वरलू, डॉ. अशोक ढवण, कार्यकारी परिषदेचे सदस्य डॉ. राजीव मराठे, दिलीप देशमुख, विद्वत परिषदेचे सदस्य डॉ. पी. जी. इंगोले, शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता डॉ. उदय खोडके, संशोधन संचालक डॉ. जगदीश जहागीरदार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, बियाणे संचालक डॉ. देवराव देवसरकर, कुलसचिव पी. के. काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

राज्यपाल बैस म्हणाले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० हे भारतीय शिक्षण पद्धतीत नव्या युगाची सुरुवात आहे. कृषी पदवीधरांना भारताला कृषी क्षेत्रात आत्मनिर्भर बनविण्यासह देशाला जगाची फूड बास्केट करण्यामध्ये भूमिका निभावण्याची अनोखी संधी आहे. हवामान बदल आता दूरचे संकट राहिले नाही.

ते वास्तव असून जगातील शेतकरी या संकटाशी दररोज झुंज देत आहेत. वाढते तापमान, अनियमित ऋतुचक्र, कीटक व रोगांचा वाढता प्रादुर्भाव, पर्जन्यमानात झालेल्या बदलामुळे कृषी क्षेत्रात पूर्वीपेक्षा अधिक आव्हाने निर्माण झाली आहे. हवामान बदलांत टिकून राहण्यासाठी आवश्यक माहिती कृषी विद्यापीठांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी.

डॉ. संजय कुमार म्हणाले की, देशाचा जीडीपी वाढविण्यात कृषी क्षेत्राची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. यापुढे प्रमाणित शेतीमालाचे उत्पादन करावे लागेल. या समारंभात २०२१-२२ आणि २०२२-२३ या दोन शैक्षणिक वर्षातील विविध विद्या शाखांतील एकूण ११ हजार २ स्नातकांना विविध पदवी, पदव्युत्तर पदवी, आचार्य पदवीने अनुग्रहीत करण्‍यात आले. तसेच दात्‍यांनी ठेवलेली सुवर्णपदके, रौप्‍यपदके, रोख पारितोषिके, प्रमाणपत्रे पात्र स्‍नातकांना प्रदान करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabinet Meeting : राज्य मंत्रिमंडळ बैठकीत ७ निर्णय; परिवहनची अतिरिक्त जमीन व्यापारी तत्वावर वापरास मंजुरी

Lumpy Skin : जाफराबादेत २१ जनावरांना ‘लम्पी’ची बाधा

Agriculture Solar Pump : पैसे भरूनही सौरपंप मिळेना

Jayakwadi Dam : ‘जायकवाडी’तून गोदावरी पात्रात विसर्ग थांबविला

Krishi Seva Kendra : आठ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

SCROLL FOR NEXT