Water Storage  Agrowon
ॲग्रो विशेष

Parbhani Water Storage : ‘येलदरी’त ४९.७४, तर सिध्देश्वर धरणात १६.३६ टक्के पाणीसाठा

Agriculture Irrigation : २०२४ मध्ये पाणलोटात झालेल्या जोरदार पावसामुळे येलदरी धरण भरले होते. १ जून २०२४ पासून धरणक्षेत्रात ११५६ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

Team Agrowon

Parbhani News : परभणी व हिंगोली जिल्ह्यांच्या सीमेवरील पूर्णा नदीवरील येलदरी धरणामध्ये सोमवारी (ता. १२) सकाळी ८ वाजता ४०२.७८५ एमएमक्युबनुसार ४९.७४ टक्के तर सिध्देश्वर धरणात १३.२४४ एमएमक्युबनुसार १६.३६ टक्के पाणीसाठा होता.

सिध्देश्वर धरणात पाणी सोडण्यात येलदरी धरणातील पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे. कालव्याची आवर्तने, उपसा सिंचन, पाणीपुरवठा योजना, बाष्पीभवन यामुळे या दोन धरणातील पाणीसाठा घट झाली आहे.

२०२४ मध्ये पाणलोटात झालेल्या जोरदार पावसामुळे येलदरी धरण भरले होते. १ जून २०२४ पासून धरणक्षेत्रात ११५६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. गतवर्षी (२०२३) एकूण ७०५मिलिमीटर पाऊस झाला होता.

धरणाच्या जलाशयात १ जून २०२४ एकूण ९५६.२७८ एमएमक्युब पाण्याची आवक झाली. या धरणातून दररोज जिंतूर शहर पाणीपुरवठा योजनेसाठी ०.००७ एमएमक्युब, परभणी शहर पाणीपुरवठा योजनेसाठी०.०३२ एमएमक्युब, सेनगाव शहर पाणीपुरवठा योजनेसाठी ०.००२ एमएमक्युब पाणी वापर आहे.

उपसा सिंचन योजनांद्वारे ०.००८ एमएमक्युब वापर झाला. बाष्पीभवनाव्दारे ०.४७५ एमएमक्युब व इतर व्यय ०.०१६ एमएमक्युब आहे. वीजनिर्मितासाठी ३५.०८६ एमएमक्युब पाणी वापर झाला. सिंचनासाठी सिद्धेश्वर धरणात पाणी सोडण्यात आले. त्यामुळे पाणीसाठ्यात घट झाली. सोमवारी (ता. १२) सकाळी ४९.७४ टक्के पाणीसाठा शिल्लक होता.

गतवर्षी (२०२४) १२ मे रोजी २३८.७८६ एमएमक्युब म्हणजेच (२९.२८ टक्के) पाणीसाठा होता. पूर्णा नदीवरील येलदरी धरणाच्या खालच्या भागातील सिद्धेश्वर धरणांमध्ये सोमवारी (ता. १२) सकाळी ८ वाजता १३.२४४ एमएमक्युब (१६.३६ टक्के) पाणीसाठा शिल्लक होता. गतवर्षी १२ मे रोजी या धरणात उपयुक्त पाणीसाठा नव्हता.

धरण क्षेत्रात १ जून २०२४ पासून आजवर १००५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. गतवर्षी (२०२३) ९२९ मिलिमीटर पाऊस झाला होता. १ जून २०२४ पासून धरणात ८७३.४९७ एमएमक्युब पाण्याची आवक झाली आहे.

पाणीपुरवठ्यासाठी ४.७४० एमएमक्युब पाणीसाठा राखीव आहे. उपसा सिंचनाद्वारे ५.५९० एमएमक्युब पाणी वापर झाला. १ जुलै २०२४ पासून धरणातून २९७.६२० एमएमक्युब पाणी सोडण्यात आले. कालव्याद्वारे ५४९ क्युसेक विसर्ग आहे. त्यामुळे या धरणातील पाणीसाठा कमी होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT