Ujani Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Ujani Dam Water Level : उजनीत ६० टक्के पाणी पातळी; आतापासूनच नियोजनाची गरज

Ujani Dam Water Capacity : उजनी भरल्यानंतर ११७ टीएमसी पाणी वर्षभरात पुरत नाही हा दरवर्षीचा अनुभव आहे. शंभर टक्के उजनी भरून दरवर्षी पाणलोट क्षेत्रात भीषण पाणीटंचाई व दुष्काळी परिस्थिती जाणवत असते.

Team Agrowon

Solapur News : गतवर्षी पूर्ण क्षमतेने व ओव्हर फ्लो झालेले उजनी धरण यंदा पुण्याच्या पाण्यावर कसेबसे ६० टक्के भरले, पण करमाळा व इंदापूर तालुक्यातील बहुतांश लहान मोठे तलाव आजही कोरडे ठाक आहेत.

त्यात आता पावसाने निरोप घेतला आहे. त्यामुळे यंदाची धरणातील पाण्याची परिस्थिती तशी चिंतेची आहे. आता या उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन होण्याची गरज आहे. वास्तविक, उजनी भरल्यानंतर ११७ टीएमसी पाणी वर्षभरात पुरत नाही हा दरवर्षीचा अनुभव आहे.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शंभर टक्के उजनी भरून दरवर्षी पाणलोट क्षेत्रात भीषण पाणीटंचाई व दुष्काळी परिस्थिती जाणवत असते. मार्च ते जून या चार महिन्यात उजनीतील उपयुक्त पाणीसाठा संपून तो उणेत जातो आणि त्या पाण्यावरून नगर, पुणे व सोलापुर जिल्ह्याचे राजकारण तापलेले असते.

उजनीच्या पाण्यावर मुळात कालवा सल्लागार समिती नसल्याने पाणी सोडण्याची सूत्रे ही सर्वस्वी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या हातात आहेत. उजनीच्या पाण्याचा थेंब ना थेंब वापरता यावा यादृष्टीने सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी खालील बाजूला जमिनी घेतल्या आहेत.

वरून औद्योगिकरणाचे जाळेही विणून ठेवले आहे. याव्यतिरिक्त सोलापूरसह शिरापूर, आष्टी, बार्शी, एकरुख, दहिगाव, जोडकालवा सीना, भीमा, सांगोला, मंगळवेढा या उपसा योजना अवलंबून आहेत.

या सगळ्यातून उजनीच्या पाण्यावर होणारी आंदोलने ही राजकीय प्रेरित असतात हेही झाकून राहिले नाही. मात्र याचा थेट परिणाम खऱ्या धरणग्रस्त व भूमिपुत्रांवर, शेतकऱ्यावर होतो, हे देखील नाकारता येत नाही. यातूनच बळीराजा व मच्छीमार हे दरवेळी बळी ठरत आलेले आहेत.

त्यात आता यावर्षी जो पाऊस झाला तो सर्वदूर न होता. ठरावीक भागात बसला. उजनी धरण तर पूर्णपणे पुणे जिल्ह्याच्या वरच्या भागातील घाटमाथ्यावरच्या पावसावर व धरणातील पाण्यावर अवलंबून असणारे धरण आहे.

त्यामुळे पाण्याची ही सगळी मागणी आणि उपलब्ध पाणी, याचा योग्य मेळ घालणे आवश्यक आहे. शिवाय वर्षभर ते कसे पुरणार, याचाही विचार या नियोजनात होणे आवश्यक आहे.

पुणे जिल्हा परिसर तसेच धरण साखळीत झालेल्या पावसाच्या बळावर उजनी धरणांने ६० टक्के पर्यंतची मजल मारली आहे. त्यामुळे आगामी उन्हाळा त्रासाचा ठरणार आहे.
- शहाजी पाटील, केत्तूर
पाण्याचा वापर काटकसरीने केला नाही, तर उजनीवर अवलंबून असणाऱ्यांवर जलसंकट येण्याची शक्यता आहे. शासकीय पातळीवर पाण्याचे योग्य नियोजन करावे लागणार आहे.
- अशोक पाटील, शेतकरी, केत्तूर
उजनी धरणातील पाण्यावर सर्वांचा अधिकार असताना मूळ धरणग्रस्तांसाठी मात्र कसलेही प्रकारचा पाणीसाठा राखीव ठेवला जात नाही, तो ठेवण्याची गरज आता निर्माण झाली आहे.
- अॅड. अजित विध्ने, केत्तूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sustainable Agriculture Day: डॉ. स्वामिनाथन यांचा जन्मदिवस शाश्‍वत शेती दिन

Sugar Production: देशात जुलैअखेर साखरेचे २५८ लाख टन उत्पादन

Agriculture Department: 'कृषी’तील बदल्यांचा सावळागोंधळ सुरू

Maharashtra Rain Update: विदर्भात विजांसह पावसाची शक्यता

Anti Corruption: विहिरीच्या नोंदीसाठी लाच मागणारा लिपिक ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात 

SCROLL FOR NEXT