Water Scarcity Agrowon
ॲग्रो विशेष

Water Issue : पाणीपुरवठा मंत्र्यांच्या गावातच येतयं तीन दिवसांआड पाणी

Water Shortage : पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी (ता. धरणगाव) गावास टंचाईचे चटके अनेक वर्षे बसत आहेत. त्याचबरोबर तीन दिवसाआड गावास पाणीपुरवठा होत असल्याचे चित्र दिसत आहे.

Team Agrowon

Jalgaon News : पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी (ता. धरणगाव) गावास टंचाईचे चटके अनेक वर्षे बसत आहेत. गावात अनियमित व अनेक दिवसांनी पाणीपुरवठ्याची समस्या होती. त्यात अलीकडे ही समस्या दूर करण्यासंबंधी कार्यवाही झाली आहे. परंतु तरीदेखील तीन दिवसाआड या गावास पाणीपुरवठा होणार आहे, असे दिसत आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत २२ कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली होती. त्या कामाची नुकतीच अधिकारी व अन्य मंडळीने पाहणी केली. तसेच योजनेची संपूर्ण माहिती घेतली. यामध्ये कांताई बंधारा येथून बारा किलोमीटरची जलवाहिनी केली आहे. अशुद्ध पाणी पंपिंगसाठी ५० अश्वशक्तीचे तीन नग बसविण्यात आले असून,

जलशुद्धीकरण केंद्र चार ‘एमएलडी’चे आहेत. शुद्ध पाणी पंपिंग मशिनरी १५ अश्वशक्तीचे तीन नग बसविण्यात आले आहेत. तीन नवीन जलकुंभ देखील तयार केले आहेत. अशा या अत्याधुनिक पाणीपुरवठा योजनेची आज पाहणी केली असून, पाळधीवासियांसाठी पाणी दर तीन दिवसांआड मिळणार आहे, असा दावा प्रशासनाने केला आहे.

पाळधीची लोकसंख्या २५ हजारांवर आहे. धरणगगावातील मोठे गाव म्हणून पाळधीची ओळख आहे. परंतु पाळधीत सतत टंचाई असते, असा मुद्दा ग्रामस्थ, नागरिक उपस्थित करायचे. त्यावर प्रशासनाने प्रयत्न करून ही योजना आणली आहे. यातून किमान एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करावे, अशी मागणी केली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Pre-Cultivation: शेतांची पूर्वमशागत सुरू

Rajshree Yojana: मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी ‘राजश्री योजना’; ५० हजारांची मदत

Siddheshwar Sugar Factory: ‘सिद्धेश्‍वर’ला थकहमी;मात्र कर्ज मंजुरीची प्रतीक्षा

Grain Festival: कोल्हापुरात धान्य महोत्सवास प्रारंभ

Drip Irrigation: ‘ठिबक’चे साडेचार कोटी मार्चअखेर मिळणार

SCROLL FOR NEXT