अभिजीत पोवारRajasthan Government: राजस्थान सरकारची ‘मुख्यमंत्री राजश्री योजना’ही मुलींच्या शिक्षणाला चालना देणारी महत्त्वपूर्ण योजना ठरत आहे. या योजनेअंतर्गत मुलींच्या जन्मापासून ते बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण होईपर्यंत एकूण ५० हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. मुलींना शिक्षणात पुढे नेणे आणि त्यांना स्वावलंबी बनवणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे..२०१६ नंतर जन्मलेल्या मुलींनाच मिळतो योजनेचा लाभराजस्थान सरकारने २०१६ मध्ये ही योजना सुरू केली असून ती राज्यातील मुलींसाठी लागू आहे. या योजनेचा लाभ २०१६ नंतर जन्मलेल्या आणि राजस्थानमध्ये राहणाऱ्या मुलींनाच मिळतो. योजनेअंतर्गत मिळणारी आर्थिक मदत टप्प्याटप्प्याने थेट लाभार्थी मुलीच्या बँक खात्यात जमा केली जाते..PM Surya Ghar Yojana: पंतप्रधान सूर्यघर मोफतवीज योजनेत महाराष्ट्र प्रथम.थेट बँक खात्यात जमा होणारी रक्कम; पारदर्शक प्रक्रियाया योजनेनुसार, मुलीच्या जन्मावेळी २ हजार ५०० रुपये दिले जातात. त्यानंतर मुलगी एक वर्षाची झाल्यावर पुन्हा २ हजार ५०० रुपये मिळतात. .Swarnima Scheme: महिलांना मिळणार फक्त ५ टक्के व्याजदरात २ लाखांपर्यंत कर्ज! जाणून घ्या सरकारच्या ‘स्वर्णिमा' योजनेची A to Z माहिती.शाळेत प्रवेश घेतल्यावर ४ हजार रुपये, सहावीमध्ये प्रवेश घेतल्यावर ५ हजार रुपये, दहावीत गेल्यावर ११ हजार रुपये आणि बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर २५ हजार रुपये अशी एकूण ५०हजार रुपयांची मदत दिली जाते..शिक्षणास प्रोत्साहन देत मुलींच्या सक्षमीकरणावर भरही योजना मुलींच्या शिक्षणासाठी मोठा आधार ठरत असून आर्थिक अडचणींमुळे शिक्षण पासून वंचित होऊ नये, यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. तसेच मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे. राज्य सरकारने या योजनेसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला असून अनेक कुटुंबांना याचा फायदा होत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.