Drip Irrigation Subsidy: केंद्र सरकारच्या सूक्ष्म सिंचन योजनेंतर्गत चालू वर्षात बसविण्यात आलेल्या ठिबक संचासाठी राज्य सरकारने २३५ कोटी रुपयांचे पूरक अनुदान मंजूर केले आहे. या निर्णयामुळे सोलापूर जिल्ह्यातील सुमारे तीन हजार शेतकऱ्यांना मार्चअखेर ४ कोटी ५१ लाख रुपयांचे अनुदान मिळणार असून, त्यासाठी कृषी विभागाने हालचाली वेगात सुरू केल्या आहेत..‘प्रतिथेंब अधिक पीक’ या राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत ठिबक सिंचनासाठी मूलभूत अनुदान दिले जाते. यामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांना ५५ टक्के, तर दोन हेक्टरपेक्षा जास्त जमीनधारकांना ४५ टक्के अनुदान मिळते. मात्र, खर्चाच्या तुलनेत हे अनुदान अपुरे ठरत असल्याने मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेतून पूरक अनुदान देण्यात येते..Drip Irrigation Cost: ठिबक सिंचन सामग्री दरांत वाढ.राज्य सरकारने २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात पूरक अनुदानासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यापैकी ४०० कोटी सूक्ष्म सिंचनासाठी, तर १०० कोटी वैयक्तिक शेततळ्यांसाठी राखीव होते. सुरुवातीला केवळ १०० कोटींचे वितरण झाले होते; मात्र आता दुसऱ्या टप्प्यात निधी मंजूर झाल्याने अनुदान वाटपाला गती मिळणार आहे..राज्यातील स्थितीपूरक अनुदानामुळे राज्यातील सुमारे १ लाख १५ हजार शेतकऱ्यांना अतिरिक्त लाभ मिळणार आहे. सुधारित अनुदानानुसार अल्पभूधारकांना ८० टक्के, तर मोठ्या शेतकऱ्यांना ७५ टक्केपर्यंत मदत दिली जाईल. २०२५-२६ मध्ये सुमारे ७० हजार हेक्टर क्षेत्रावर बसविलेल्या ठिबक संचांना याचा फायदा होणार आहे..Drip Irrigation Subsidy: ठिबक अनुदान वितरणात जळगाव अव्वल.आता निधी पुढील वर्षीएकूण ५०० कोटींच्या तरतुदीपैकी आतापर्यंत सुमारे ३५० कोटी रुपयेच उपलब्ध झाले आहेत. उर्वरित १५० कोटींचा निधी चालू आर्थिक वर्षात मिळण्याची शक्यता कमी असून, तो पुढील वर्षात वर्ग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे..निधी दिल्यामुळे अनुदानाचे प्रमाणअल्पभूधारक शेतकरी ८० टक्क्यांपर्यंत अनुदान२ हेक्टरपेक्षा जास्त जमीनधारक ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान.सोलापूर जिल्ह्याची ठिबक सिंचन आकडेवारीएकूण लाभार्थी शेतकरी - ४,५५५आतापर्यंत वितरित निधी - २.६७ कोटी रुपयेअनुदान मिळालेले शेतकरी - १,५४३उर्वरित लाभार्थी - ३,०१२आवश्यक निधी - ४.५१ कोटी रूपये.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.