Jayakwadi Left Water Canal Agrowon
ॲग्रो विशेष

Jayakwadi Water : जायकवाडी कालव्याद्वारे चारा पिकांना व जनावरांना पिण्यासाठी पाणी

Jayakwadi Left Water Canal : जायकवाडी डाव्या कालव्याद्वारे चारा पिके तसेच जनावरांना पिण्यासाठी २००० क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे.

Team Agrowon

Parbhani News : जायकवाडी डाव्या कालव्याद्वारे चारा पिके तसेच जनावरांना पिण्यासाठी २००० क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. उजव्या कालव्याव्दारे ४०० क्युसेकने विसर्ग सुरु आहे. त्यामुळे रविवारी (ता. ७) सकाळी जायकवाडी धरणांमध्ये १८.४० टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता.

जायकवाडी डाव्या कालव्याचे सर्वाधिक लाभक्षेत्र परभणी जिल्ह्यात आहे. पाथरी, मानवत, परभणी, गंगाखेड, पूर्णा तालुक्यातील गावांचा लाभक्षेत्रात समावेश आहे. यंदा या धरणात अपुरा पाणीसाठा असल्यामुळे उन्हाळी हंगामातील नियमित आवर्तने सोडण्यात आली नाहीत.

त्यामुळे लाभक्षेत्रातील उन्हाळी पिकांचा पेरा घटला आहे. कालव्याला पाणी नसल्यामुळे विहिरी, बोअर आटले आहेत. अनेक गावात पाणी टंचाई उद्भवली आहे. गेल्या काही दिवसांपासून चारा पिके व जनावरांना पिण्यासाठी मुख्य कालवा, उपकालवे, वितरिकेद्वारे पाणी सोडण्यात आले आहे असे सूत्रांनी सांगितले.

यंदा जायकवाडी डाव्या कालव्याचे नियमित आवर्तने नसल्यामुळे उन्हाळी पिके घेता आली नाहीत. गावात तीव्र पाणी टंचाई उद्भवणार आहे. त्यामुळे मे महिन्यात कालव्याद्वारे पाणी सोडण्यात यावे अशी मागणी सिंगणापूर येथील शेतकरी माणिकराव सूर्यवंशी यांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढ-उतार, गवार भावात घसरण, पालक आवकेत घट, वांगी दरात चढ-उतार तर डाळिंब दरात बदल

NCC Colonel Commandant Degree: कुलगुरू डॉ. शरद गडाख यांना मानद ‘कर्नल कमांडंट’ पदवी

Analog Paneer Ban: राज्यात कृत्रिम (एनालॉग) पनीरवर वर्षभराची बंदी

Water Conservation: श्रमदानातून पाणीदार झाले ‘सालईबन’

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

SCROLL FOR NEXT