Aarfal Water Canal : आरफळ कालवा प्रश्न पेटणार

Demand on Water : आरफळ कॅनॉलवर अवलंबून असणारी सांगली जिल्ह्यासह कऱ्हाड तालुक्यातील २० हजार हेक्टर शेतीतील पिके पाण्याअभावी तहानलेली आहेत. आरफळ कालव्यातून शेतीला पाणी द्यावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
Aarfal Water Canal
Aarfal Water CanalAgrowon

Sangli News : आरफळ कॅनॉलवर अवलंबून असणारी सांगली जिल्ह्यासह कऱ्हाड तालुक्यातील २० हजार हेक्टर शेतीतील पिके पाण्याअभावी तहानलेली आहेत. आरफळ कालव्यातून शेतीला पाणी द्यावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत. मात्र, पाटबंधारे विभागाकडून दुलर्क्ष होत असल्याने शेतकरी संतप्त झाले असून आरफळ कालव्याचा पाणीप्रश्न चिघळणार आहे.

सांगली जिल्ह्यातील कडेगाव, पलूस, विटा, आटपाडी आणि सातारा जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव आणि कराड या तालुक्यांतील हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणून हा भाग सुजलाम् सुफलाम् करणारा आरफळ कॅनॉल १९९० पासून वाहत आहे. कॅनॉलसाठी कण्हेर धरणातून ३.७५ टीएमसी पाणी आरक्षित करण्यात आले आहे.

Aarfal Water Canal
Agriculture Irrigation : ‘अक्कलपाडा’च्या कालव्यांतून दोन दिवसांत आवर्तन

जलसंपदा विभागाकडून पाणी सोडण्याचे नियोजन करत असल्याने शेतीला वेळेत पाणी मिळत होते. हा कॅनॉल सुरुवातीला २९ किमी कण्हेर डावा कालवा म्हणून ओळखला जातो. पुढे सातारा तालुक्यातील आरफळ येथून आरफळ कालवा म्हणून ओळखला जातो. ते ८५ हा कालवा सातारा, कोरेगाव, कराड तालुक्यातून वाहतो आणि पुढे ८५ ते १९५, सांगली जिल्ह्यातील कडेगाव, विटा, पलूस आणि तासगाव तालुक्यातून वाहतो. या कॅनॉलची एकूण लांबी १९५ किलोमीटर आहे.

आरफळ कॅनॉलवर कोरेगाव तालुक्यातील वाठार किरोलीनजीक कोंबडवाडी येथे माण खटाव तालुक्यासाठी पंप हाऊस उभारण्यात आले आहे. या योजनेसाठी कण्हेर, तारळी आणि उरमोडी धरणातील पाणी आरक्षित करण्यात आले आहे. कण्हेर आणि उरमोडी धरणातील पाणी याच आरफळ कॅनॉलमधून कोंबडवाडीपर्यंत येते आणि तिथून पंपाद्वारे उपसून माण-खटावला देण्यात येते.

Aarfal Water Canal
Agriculture Irrigation : दक्षिण सोलापुरातील सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी प्रयत्न

दरम्यान आरफळसाठी आरक्षित असलेले पाणी माण-खटावला देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि या बदल्यात तारळी धरणातील पाणी आरफळला देण्याचा वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला गेला. मात्र तारळी धरणातील पाणी कोपर्डे लिंकद्वारे आरफळमध्ये सोडण्याचे कागदावर नियोजन आहे, मात्र पुनर्वसन व इतर प्रश्नांमुळे हा लिंक कॅनॉल आरफळला जोडण्याचे सुमारे १०० मीटरचे काम मंदगतीने सुरू आहे. त्यामुळे तारळी घरणातून आरफळला पाणी देताच येत नाही.

आरफळमधून सातारा, कोरेगाव, कऱ्हाड आणि सांगली जिल्ह्यासाठी नियमित पाणी देण्यासाठी रोटेशननुसार पाणी सोडण्यात येत होते. मात्र आरफळचे एखादे गेट उघडून केवळ १५० क्युसेक इतकाच विसर्ग पुढे जात असल्यामुळे कमी दबावाने पाणी पुढे जात नाही. कोंबडवाडी योजना सुरू झाल्यानंतर आरफळच्या पाणी नियोजनाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

माण, खटाव तालुक्यासाठी कोंबडवाडी येथून पाणी उचलून नेण्यास हरकत नाही. नवीन प्रस्तावित रोटेशननुसार पुढील काळात कऱ्हाडला २२ एप्रिलला, तर सांगलीला ७ एप्रिलला पाणी सोडले जाईल. आवश्यकता असताना आरफळमधून पाणी का सोडले जात नाही, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com