Jayakwadi Water : औष्णिक विद्युत केंद्रासाठी जायकवाडीतून पाणी सोडले

Left Canal Jayakwadi Project Water Supply : परळी येथील औष्णिक विद्युत केंद्रासाठी खडका बंधाऱ्याकरिता जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या काव्यातून सोमवारी सायंकाळी पाणी सोडण्यात आले.
Jayakwadi Dam
Jayakwadi DamAgrowon
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : परळी येथील औष्णिक विद्युत केंद्रासाठी खडका बंधाऱ्याकरिता जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या काव्यातून सोमवारी सायंकाळी पाणी सोडण्यात आले. मंगळवारी (ता. १९) या पाण्याचा विसर्ग काही प्रमाणात वाढविण्यात आला होता.

जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून या आधी १०० क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आलेला विसर्ग पुढे वाढविण्यात आला होता. जायकवाडी प्रकल्पातून डाव्या कालव्याद्वारे परळी औष्णिक केंद्र यांना वीजनिर्मिती करता पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी २०२५ पर्यंत ३९.५० दलघमी आवश्यकतेचा करारनामा देखील करण्यात आला आहे.

Jayakwadi Dam
Jayakwadi Dam : जायकवाडीमुळे जनावरांच्या चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न सुटणार?

त्यानुसार परळी औष्णिक केंद्र यांना एकूण १०.९९ दलघमीचा पाणीपुरवठा करण्यात आला आहे. पुरवठा केलेल्या पाण्याचे देयक मुख्य अभियंता परळी औष्णिक विद्युत केंद्र यांना सादर करण्यात आले. जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या सूत्रानुसार त्या वेळी खडका बंधाऱ्याची पाणीपातळी ३७१.८० मीटर होती. ते सुमारे पाच ते सहा दिवस पूर्ण क्षमतेने विद्युत निर्मितीसाठी पुरेल असे कळविण्यात आले होते.

त्यामुळे खडका बंधारा पूर्ण क्षमतेने पाणी पातळी भरेपर्यंत विनंती केली होती. यापूर्वी खडका बंधारा पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी १२ दलघमी पाण्याची अपव्ययासहित आवश्यकता होती. त्याकरता १३०० क्युसेक विसर्ग देण्यात यावा अशी विनंती त्या वेळेस जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक दोनकडून कार्यकारी अभियंता जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक एक नाथसागर पैठण यांच्याकडे करण्यात आलेली होती.

Jayakwadi Dam
Jayakwadi Dam : जायकवाडी धरणाच्या सौर ऊर्जा प्रकल्पावरून वातावरण तापले, मच्छिमारांचे जलसमाधी आंदोलन

त्यानुसार डाव्या काव्यातून १०० क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला होता. आता पुन्हा १३ मार्च रोजीच्या पत्रानुसार पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यासाठी परळी येथील औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता यांनी पाठवलेल्या पत्राचा संदर्भ देण्यात आला आहे त्या पत्रानुसार पाण्याअभावी निर्मिती बंद होऊ शकते त्यामुळे डाव्या कालव्यातून तत्काळ पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती.

त्यानुसार सोमवारी (ता. १८) सायंकाळी ७ ते ८ वाजेदरम्यान १०० क्युसेकने विसर्ग सुरू करुन कालवा मुखाशी विसर्ग स्थिर करण्यात आला. त्यानंतर या विसर्गात ५०० क्युसेकपर्यंत वाढ करण्यात आली. मंगळवारी (ता. १९) दुपारी १२ ते १ वाजेदरम्यान या विसर्गात पुन्हा वाढ करण्यात येणार होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com