Koyna Dam water storage agrowon
ॲग्रो विशेष

Koyna Water Dispute : कोयनेतील पाण्याचा वाद पेटणार

Water Crisis : कोयना धरणात पाणीसाठा कमी असल्यामुळे बारमाही हरित असलेल्या कृष्णा- कोयना काठालाही टंचाईची झळ बसू लागली आहे.

हेमंत पवार

Karad News : यंदा पर्जन्यमान कमी झाल्यामुळे आता हिवाळ्यातच दुष्काळाचे चटके बसत आहेत. कोयना धरणात पाणीसाठा कमी असल्यामुळे बारमाही हरित असलेल्या कृष्णा- कोयना काठालाही टंचाईची झळ बसू लागली आहे. कोयना धरणातून सिंचनासाठी पाणी सोडण्यावरून सातारा व सांगली जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधींमध्ये खडाजंगी सुरू आहे.

त्यामुळे उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यावर हक्क सांगत ते मिळवण्याचा प्रयत्न सांगली जिल्ह्यातील राजकीय नेते करत आहेत. त्यासाठी साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांना टार्गेट केले जात आहे.

खासदार संजयकाका पाटील यांनी, तर कोयनेच्या पाण्यासाठी खासदारकी पणाला लावण्याचा इशारा दिला आहे. सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनीही पाण्यासाठी साताऱ्याच्या पालकमंत्र्यांना टार्गेट केले, तर आमदार लाड यांनी मोर्चा काढून प्रशासनाला इशारा दिला. मात्र, साताऱ्याचे पालकमंत्री देसाई यांनी सावध पवित्रा घेतला आहे. कोयना धरणातील पाण्यावरून यापुढील काळात दोन्ही जिल्ह्यांतील नेत्यांमध्ये खटके उडण्याची चिन्हे आहेत.

कोयना धरणाची स्थिती अशी

कोयना धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी इतकी आहे. मात्र, यावर्षी पावसाळी हंगामापूर्वी १ जून रोजी धरणात १७.६४ टीएमसी पाणीसाठा होता, तर यंदा मागील वर्षीच्या तुलनेत पर्जन्यमानात ४४० मिलिमीटरची तूट आणि आवाकमध्येही ३९.७१ टीएमसी इतकी घट झाली.

त्यातच १ जून ते १४ ऑक्टोबर या कालावधीत सिंचनासाठी ५.४६ आणि वीजनिर्मितीसाठी २३.०३ टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे. धरणामधून सिंचनासाठी ४२.७० टीएमसी वार्षिक पाणी वापराचे प्रकल्पीय नियोजन असते. रब्बी व उन्हाळी हंगामामधील सिंचन व वीजनिर्मितीसाठी एकूण ७० टीएमसी इतका मर्यादेत पाणीवापर करण्याबाबत सूचना आहे.

पावसाअभावी ११.७१ टीएमसीची कपात प्रस्तावित

यावर्षी कमी पर्जन्यमान झाल्याने कोयना धरण भरले नाही. त्यामुळे सिंचन आणि वीजनिर्मितीच्या नियोजित पाणी वापरात ११.७१ टीएमसी कपात प्रस्तावित करण्यात आलेली आहे. यामध्ये सिंचनासाठीच्या पाण्याची २.८६ आणि वीज निर्मितीसाठीच्या पाण्याची ८.८५ टीएमसी पाणी कपात प्रस्तावित करण्यात आली आहे.

धरणातील पाण्याची विभागणी अशी

३कोयना धरणात ८९ टीएमसी पाणी आहे. त्या पाण्यापैकी ३५ टीएमसी पाणी सिंचनासाठी ठेवले आहे. पैकी तीन टीएमसी पाणी सातारा जिल्ह्यातील योजनांसाठी आहे, तर ३२ टीएमसी पाणी सांगलीसाठी आहे. त्यात प्राधान्याने टेंभू, ताकारी योजनांसह खासगी उपसा सिंचन योजनांचा समावेश आहे. सांगलीला ३२ टीएमसी हक्काचे पाणी देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

सांगली शहरासह सर्व शहरांसाठी पिण्याचा पाणीपुरवठा करण्यामध्ये कोणतीही अडचण नाही. याबाबत स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो आहे. त्यामुळे कोयना धरणातून विसर्ग थांबणार नाही. आवश्यकता भासेल त्याप्रमाणे पुरेसे पाणी सोडण्यात येईल.
- शंभूराज देसाई, पालकमंत्री, सातारा
सांगलीसह कृष्णाकाठच्या गावांसाठी हक्काचे पाणी सोडण्यास विलंब करणाऱ्या साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्‍या नावे कोयनेचा सातबारा नसून पाण्यासाठी सांगली जिल्ह्यास वेठीस धरणाऱ्या प्रवृत्तीचा आपण निषेध करतो.
- संजयकाका पाटील, खासदार, सांगली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance Compensation: पीकविम्याची भरपाई सोमवारी थेट खात्यात येणार; २०२२ ते रब्बी २०२४-२५ ची भरपाई मिळणार

Agrowon Podcast: कापूस दर दबावातच; उडद- ढोबळी मिरचीचे भाव स्थिर, काकडीचे दर नरमले, तर पेरुचा आवक स्थिर

Ragi Cultivation: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भात, नाचणी रोप लागवड पूर्ण

Solar Power: सांगली, कोल्हापुरात ‘सौर कृषिवाहिनी’ योजनेला गती द्या; लोकेश चंद्र

Monsoon Rain: आज, उद्या राज्यात पावसाची शक्यता; विदर्भात पावसाचा जोर कमीच राहण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT