Agriculture Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Irrigation : इसापूर धरणातून रब्बी, उन्हाळी हंगामासाठी पाणी आवर्तने

Rabi Season 2024 : इसापूर येथील उर्ध्व पेनगंगा धरणाच्या कालव्याद्वारे हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात ३ आणि उन्हाळी हंगामात ४ पाणी आवर्तने देण्याचे नियोजन आहे.

Team Agrowon

Hingoli News : इसापूर येथील उर्ध्व पेनगंगा धरणाच्या कालव्याद्वारे हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात ३ आणि उन्हाळी हंगामात ४ पाणी आवर्तने देण्याचे नियोजन आहे. रब्बी हंगामातील पहिल्या आवर्तनाचा कालावधी रविवार (ता. १) ते २२ डिसेंबर राहील. सिंचनासाठी पाणी असलेल्या शेतकऱ्यांना पाणी मागणी अर्ज सादर करावे लागतील.

प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील लाभधारकांना रब्बी हंगामातील हंगामी, दुहंगामी तसेच दुहंगामातील इतर उभी पिके या पिकांसाठी कालव्याचे प्रवाही, कालव्यावरील उपसा, नदी-नाल्यावरील मंजूर उपसा सिंचन योजनेद्वारे सिंचनासाठी पाणी घ्यायचे असल्यास मागणी अर्ज नमुना ७, ७-अ मध्ये भरून संबंधित शाखा कार्यालयात सादर करणे बंधनकारक राहील.

हंगामी व दुहंगामी पिकांसाठी स्वतंत्र अर्ज सादर करावेत. प्राप्त मागणी अर्ज संख्या विचारात घेऊनच प्रत्यक्ष सिंचनासाठी पाणी सोडण्यात येईल. इसापूर उजवा व डाव्या कालव्याद्वारे यंदाच्या रब्बी हंगामासाठी ३ आवर्तने प्रस्तावित आहेत.

पहिले आवर्तन रविवारपासून (ता. १) २२ डिसेंबरपर्यंत, दुसरे आवर्तन १ ते २२ जानेवारी २०२५ आणि तिसरे आवर्तन १ ते २२ फेब्रुवारी २०२५ पर्यंत राहील. पाऊस किंवा आकस्मिक घटनांमुळे आवर्तनांच्या तारखेत बदल होऊ शकतो. लाभधारकांना त्यांच्याकडील संपूर्ण थकबाकी पाणीपट्टी भरावी लागेल. पिकांचे मागणी क्षेत्र २० आरच्या पटीत असावे. अर्जासोबत उपसा सिंचन परवानगीची प्रत जोडावी.

पाणी अर्जासोबत अपत्याबाबतचे प्रमाणपत्र व अल्प, अत्यल्प भूधारक असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करावे. कालव्याचे पाणी शेतात नेण्यासाठी असलेली शेतचारी स्वच्छ व व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी संबंधित लाभधारकाची आहे.

उर्ध्व पेनगंगा प्रकल्पांतर्गत इसापूर डावा कालवा व इसापूर उजवा कालवा व त्याअंतर्गत असलेल्या वितरण व्यवस्थेद्वारे प्रत्येक पाणीपाळीच्या कालवा संचलनाच्या प्रस्तावीत कार्यक्रमानुसार प्राप्त मागणीनुसार सिंचनासाठी पाणी सोडण्यात येईल. प्रकल्प लाभधारकांनी सर्व अटी व नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्रमांक १ चे कार्यकारी अभियंता अ. बा. जगताप यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Road Committee: शेतरस्त्यांसाठी समिती स्थापन करणार : फडणवीस

Mahakrushi App: ‘महाकृषी’ ॲपमुळे कामकाजात पारदर्शकता

APMC Cess Scam: सेस चोरीप्रकरणी ‘पणन’ने अहवाल मागविला

Maize Production: राज्यात यंदा खरिपात मका क्षेत्र वाढीचा अंदाज

Raisin Illegal Import: चीनमधून बेदाण्यांची बेकायदा आयात थांबवा

SCROLL FOR NEXT