Agriculture Irrigation : जायकवाडी डाव्या कालव्यातून रब्बीसाठी पहिले आवर्तन

Jayakwadi Dam : जायकवाडी प्रकल्पातून दोन टप्प्यात सुमारे २७ दिवस आवकेनुसार कमी अधिक प्रमाणात विसर्ग सुरू होता. तर प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून होणारा विसर्ग आधीच थांबविण्यात आला होता.
Agriculture Irrigation
Agriculture IrrigationAgrowon
Published on
Updated on

Chh. Sambhajinagar News : जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून रब्बी हंगामासाठी सोमवारी (ता. २५) सायंकाळी सुरू करावयाचे पहिले आवर्तन तांत्रिक अडचणीमुळे मंगळवारी (ता. २६) सायंकाळी ५ ते ६ च्या दरम्यान सुरू करण्यात आले. याचा छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी जिल्ह्यातील सिंचनाला लाभ होण्याची आशा आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, उपकार्यकारी अभियंता बलभीम बुधवंत यांचे हस्ते मंगळवारी (ता. २६) सायंकाळी १०० क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला. बुधवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास हा विसर्ग २०० क्युसेक करण्यात आला होता. टप्प्याने हा विसर्ग वाढवत नेऊन २००० क्युसेकपर्यंत नेला जाणार आहे.

जायकवाडी प्रकल्पातून दोन टप्प्यात सुमारे २७ दिवस आवकेनुसार कमी अधिक प्रमाणात विसर्ग सुरू होता. तर प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून होणारा विसर्ग आधीच थांबविण्यात आला होता. त्या वेळी मराठवाड्यातील सर्वांत मोठ्या जायकवाडी प्रकल्पातून नोव्हेंबरच्या अखेरच्या दहा दिवसांत पहिले आवर्तन सुटण्याची आशा व्यक्त केली गेली होती. ती प्रत्यक्षात येताना दिसते आहे.

Agriculture Irrigation
Agriculture Irrigation : वीर, खडकवासलातून रब्बीसाठी आवर्तन सुरू

प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून सोमवारी (ता. २५) सायंकाळी रब्बीसाठीचे पहिले आवर्तन सुरू करण्याचे जायकवाडी प्रकल्प प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. परंतु वळण रस्त्यासाठी कॅनॉलमध्ये टाकलेल्या मातीच्या भरावामुळे सोमवारी नियोजनुसार पाणी सोडणे शक्य झाले नाही. भराव काढून ते पाणी मंगळवारी सोडण्याच्या हालचाली सुरू होत्या.

Agriculture Irrigation
Agriculture Irrigation : जायकवाडी डाव्या कालव्यासह वितरण प्रणालीची दुरवस्था

दुपारपर्यंत न सुटलेले पाणी सायंकाळी चारपर्यंत सुटण्याची आशा होती. अखेर सायंकाळी ५ ते ६ च्या दरम्यान १०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. साधारणपणे जूनपर्यंत लागोपाठ रब्बी व उन्हाळी आवर्तनाची चक्र सुरू राहणार असल्याची माहिती प्रकल्प प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

रब्बीसाठी ३ तर उन्हाळी हंगामासाठी ४ आवर्तने

१३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी जायकवाडी प्रकल्प प्रशासनाच्या वतीने जाहीर केलेल्या पाणीसाठ्याच्या आकडेवारीवरून जायकवाडीच्या तुडुंबतेवर शिक्कामोर्तब झाले होते. त्यामुळे प्रकल्पावरून अपेक्षित सिंचन क्षमतेप्रमाणेच होईल याशिवाय प्रकल्पावरून असलेल्या पाणीपुरवठा योजनांचा पाणीपुरवठा ही सुरळीत राहील, अशी आशा निर्माण झाली होती. गतवर्षी प्रकल्पात ५० टक्के ही उपयुक्त पाणीसाठा नव्हता. यंदा मात्र चित्र बदलले आहे. त्यामुळे येत्या रब्बी हंगामासाठी तीन तर उन्हाळी हंगामासाठी चार आवर्तने प्रकल्पातून सिंचनासाठी दिली जातील अशी आशा आहे.

Agriculture Irrigation
Agriculture Irrigation : पाझर तलावात थेट पंप टाकू नका, अन्यथा कारवाई

यंदा मोठ्या प्रमाणात करावा लागला पाण्याचा विसर्ग

यंदा १ जूनपासून १४ नोव्हेंबरपर्यंत गोदावरी पात्रातून जायकवाडी प्रकल्पात साधारणता १११.०७७९ टीएमसी पाणी आले. त्यापैकी जवळपास ३०.४७४४ टीएमसी पाण्याचा विसर्ग गोदावरीच्या नदीपात्रात करावा लागला. गतवर्षी ५० टक्क्यांच्या आत पाणीसाठा असल्याने प्रकल्पाची तहान कायम होती यांना मात्र चित्र बदलले. पहिल्या टप्प्यात ९ ते १३ सप्टेंबर दरम्यान तर दुसऱ्या टप्प्यात २४ सप्टेंबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान सुमारे २७ दिवस जायकवाडी प्रकल्पातून गोदावरीच्या पात्रात सातत्याने आवक पाहून कमी अधिक प्रमाणात विसर्ग केला गेला.

१ लाख ४१ हजार हेक्टर सिंचन अपेक्षित

प्रकल्पाचे डाव्या कालव्यावरून साधारणता १ लाख ४१ हजार हेक्टर क्षेत्र सिंचित होऊ शकते. तर उजव्या कालव्याच्या आधारे जवळपास ४१ हजार हेक्टरला सिंचनासाठी पाणी मिळू शकते. याशिवाय प्रकल्पावरून लहान-मोठ्या जवळपास २७ पाणीपुरवठा योजना आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com