Agriculture Irrigation : वीर, खडकवासलातून रब्बीसाठी आवर्तन सुरू

Rabi Irrigation Update : रब्बी हंगाम सुरू झाल्याने गहू, हरभरा, ज्वारी अशा पिकांच्या पेरणीस वेग येत आहे. या पिकांना पेरणीच्या वेळेस पाण्याची अडचण येऊ नये, यासाठी रब्बी हंगामासाठी वीर, खडकवासला धरणातून आवर्तन सोडण्यात आले आहे.
Dam
DamAgrowon
Published on
Updated on

Pune News : रब्बी हंगाम सुरू झाल्याने गहू, हरभरा, ज्वारी अशा पिकांच्या पेरणीस वेग येत आहे. या पिकांना पेरणीच्या वेळेस पाण्याची अडचण येऊ नये, यासाठी रब्बी हंगामासाठी वीर, खडकवासला धरणातून आवर्तन सोडण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पाण्याची फारशी अडचण येणार नसल्याने पेरण्या वेळेत होण्यास मदत होणार आहे.

चालू वर्षी जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील धरणे तुडुंब भरली आहेत. त्यामुळे रब्बीसाठी फारशी अडचण येणार नसली तरी शेतकऱ्यांना रब्बीत चांगले उत्पादन घेता यावे यासाठी जलसंपदा विभागाकडून पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

Dam
Agriculture Irrigation : सिंचन योजनेतून शेतीसाठी २१ टीएमसी पाणी

गेल्या काही दिवसामध्ये भामा-आसखेड धरणातून १२०० क्युसेक आणि चासकमान धरणातून ४०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले होते. त्याचा अनेक शेतकनऱ्यांना फायदा झाला आहे. त्यामुळे काही प्रमाणात पेरण्या झाल्या असल्या तरी या धरणातून कालव्याला सोडण्यात आलेले पाणी बंद करण्यात आले आहे.

रब्बी हंगामात जिल्ह्यात रब्बीचे एकूण २ लाख २९ हजार ७१२ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी एक लाख ३ हजार १८६ हेक्टर म्हणजेच ४५ टक्के पेरण्या झाल्या आहेत. चालू वर्षी खरिपात झालेल्या चांगल्या पावसामुळे रब्बी ज्वारीच्या पेरणीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.

Dam
Agriculture Irrigation : सिंचनासाठी शेतकऱ्यांचे रात्री जागरण

कृषी विभागाने जवळपास दोन लाख ८० हजार ५९५ हेक्टरवर पेरणी होण्याचा दावा कृषी विभागाने केला आहे. यात ज्वारीची सुमारे एक लाख ३० हजार हेक्टरवर पेरणीची शक्यता आहे. रब्बी ज्वारीपाठोपाठ गव्हाचे ४५ हजार हेक्टर क्षेत्र आहे. हरभऱ्यांचे ३६ हजार हेक्टर क्षेत्र आहे. जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात सर्वाधिक गव्हाची पेरणी झाली आहे.

सुमारे ७९५ हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यापाठोपाठ बारामती, दौंड, इंदापूर या तालुक्यांत चांगल्या पेरण्या झाल्या आहेत. तर हवेली, मुळशी, मावळ, वेल्हे, भोर, पुरंदर तालुक्यात कमी पेरण्या झाल्या आहेत.

त्यामुळे या पेरण्या झालेल्या पिकांना उगवणीच्या व वाढीच्या अवस्थेत पाणी उपलब्ध होण्यासाठी कालव्याला पाणी सोडण्यात आले आहे. यामध्ये खडकवासलातून उजव्या कालव्याला ७०० क्युसेक, वीर धरणांतून डाव्या कालव्याला ८२७ क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे पुरंदर, बारामती, इंदापूर, दौड भागांत पाण्याची अडचण येणार नाही, असे सूत्रांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com