Water Issue Agrowon
ॲग्रो विशेष

Water Crisis : नियोजनाअभावी सोलापूरवर पाणीसंकट

Team Agrowon

Solapur News : उजनी धरणात पाणीसाठा कमी झाल्यानंतर सोलापूर शहरवासीयांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते हा आजवरचा इतिहास आहे. उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन न केल्यामुळेच ही परिस्थिती ओढवते. सोलापूर महापालिका प्रशासनाने दुबार पंपिंग व्यवस्था सज्ज ठेवली आहे. भविष्यात शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी तिबार पंपिंग देखील करण्याची गरज भासू शकते.

आजही शहर परिसरातील बाळे, शिवाजीनगर, देशमुख वस्ती, दस्तगीर नगर, तुळजापूर रोड, दहिटणे, विडी घरकुल नई जिंदगी, परिसरातील काही भाग, नीलम नगर, शांतिनगर यासारख्या हद्दवाढ भागातील नगरात एक दिवस पाणी उशिरा आले तरी नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते अशी परिस्थिती आहे.

काही ठिकाणी शहरातील रहिवासी खासगी कूपनलिकेचे पाणी विकत घेतात. . आगामी काळात उजनी धरणातून तिबार पंपिंग सुरू झाल्यानंतर शहराला सहा ते सात दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करून शहरवासीयांना सुरळीत पाणीपुरवठा कसा करता येईल यासाठी सुयोग्य व सूक्ष्म उपाय योजना करणे हा एकमेव उपाय सध्या महापालिका प्रशासनासमोर आहे.

तुळजापूर रोडवरील नागरिकांचे डोळे टँकरकडे

१९९२ पासून शहराची हद्दवाढ झाली. परंतु १९९२ पासून आजतागायत हद्दवाढ भागातील काही परिसरात महापालिका प्रशासन टँकरने पाणीपुरवठा करत आहे. सोलापूर महापालिकेने शहराचे एकूण ८ झोननिहाय विभाग केले आहेत. यामध्ये सर्वात जास्त झोन क्र. २ अंतर्गत येणाऱ्या तुळजापूर रोड भागात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

त्या खालोखाल झोन क्रमांक ४ अंतर्गत येणाऱ्या हत्तुरे वस्ती  येथील विमानतळाच्या पाठीमागील असणाऱ्या लोकवस्ती भागात सध्या टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सोलापूर शहराची हद्दवाढ झाल्यापासून या भागांमध्ये टँकरनेच पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या भागातील नागरिकांना आपला कामधंदा सोडून महापालिकेचा पाण्याचा टँकर कधी येतो याची वाट पाहावी लागते अशी परिस्थिती आजही आहे.

शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या दृष्टीने स्काडा प्रणालीचा अवलंब करून पाणी गळतीवर नियंत्रण आणले. आता वितरण व्यवस्था सुधारणेसाठी अमृत दोन अंतर्गत होणारे प्रकल्प अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यानंतर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल. कधी तांत्रिक तर कधी नैसर्गिक आपत्तीमुळे पाणीपुरवठ्यात व्यत्यय येऊ येतो. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर दुबार पंपिंग, विंधन विहिरींवर इलेक्ट्रिकल आणि सोलर पंप बसविणे आदी नियोजन सुरू आहे.
शीतल तेली-उगले, आयुक्त, महापालिका

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Soybean Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना मिळाले ९६ कोटींचे अर्थसाह्य

Soybean Cotton Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना २६५ कोटींवर अर्थसाह्य देय

MSP Procurement : ‘पणन’कडून तेरा ठिकाणी शासकीय खरेदी केंद्रे सुरू होणार

Fruit Crop Insurance : आंबा, काजू उत्पादकांना तातडीने विमा मिळावा

Soybean Cotton Subsidy : लातूरला १५१, तर धाराशिवला १४१ कोटींचे वाटप

SCROLL FOR NEXT