Shirala Nagpanchami: शिराळ्यात २३ वर्षांनंतर पुन्हा झाले जीवंत नागदर्शन

Snake Conservation: पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालय, वन्यजीव विभाग नवी दिल्ली यांच्याकडून २१ नागरिकांना शैक्षणिक उद्देशासाठीच व स्थानिक लोकांमध्ये, समाजामध्ये सर्प संवर्धनाविषयी पारंपरिक ज्ञान प्रसारण करण्यासाठी जिवंत नाग पकडण्याची परवानगी मिळाली.
Shirala Nagpanchami
Shirala NagpanchamiAgrowon
Published on
Updated on

Sangali News: पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालय, वन्यजीव विभाग नवी दिल्ली यांच्याकडून २१ नागरिकांना शैक्षणिक उद्देशासाठीच व स्थानिक लोकांमध्ये, समाजामध्ये सर्प संवर्धनाविषयी पारंपरिक ज्ञान प्रसारण करण्यासाठी जिवंत नाग पकडण्याची परवानगी मिळाली.

त्या अटी व शर्तीच्या अधिन राहून मंगळवारी (ता. २९) शिराळा येथे मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी वन कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली जीवंत नाग दाखवून प्रबोधन करण्यात आले. त्यामुळे येणाऱ्या भाविकांना २३ वर्षांनंतर पुन्हा एकवेळा नाग दर्शन झाले.

Shirala Nagpanchami
Shirala Rain: मोरणा धरण, शिवणी, टाकवे तलाव भरले

मात्र घरोघरी महिलांनी प्रतीकात्मक मातीच्या नागाची पूजा करून नागपंचमी साजरी केली. हा नागपंचमी उत्सव शिराळ्यात मोठ्या जल्लोषात हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला.गेली २३ वर्षे जिवंत नागपूजेवर बंदी असल्याने शिराळा येथे येणाऱ्या भाविकांकडून प्रतीकात्मक नागाचे पूजन करण्यात येत होते.

Shirala Nagpanchami
Sangli Water Storage : शिराळा तालुक्यातील ४७ तलाव पूर्ण क्षमतेने भरले

मात्र या वर्षी प्रबोधनाच्या माध्यामतून नागाचे दर्शन घेता आले. सकाळपासून अंबामाता मंदिरात नागमंडळ व भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. दहा वाजता महाजन यांच्या घरी मानाच्या पालखीचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुकीस सुरुवात झाली.

दरम्यान आमदार सत्यजित देशमुख व माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक, अनुसूचित जाती जमातीचे तालुकाध्यक्ष संतोष इंगवले, डॉ. अभिजित काळे, अजय जाधव यांनी मानाच्या पालखीचे दर्शन घेतले. दुपारपासून नाग मंडळांनी प्रतीकात्मक नागाची प्रतिमा गाड्यावर ठेवून मिरवणूक काढली. हा नागपंचमी उत्सव अत्यंत शांततेत पार पडला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com