Water Shortage  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : पाणीसाठा ४१ टक्क्यांवर; ४२ लघू-मध्यम प्रकल्प कोरडे

Water Shortage IN Marathwada : मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांपैकी जायकवाडी ३९ टक्क्यांवर आले असून बीडमधील माजलगाव प्रकल्पात केवळ ६ टक्के उपयुक्त पाणी साठा शिल्लक आहे.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांवर पाणीबाणीचे संकट घोंगावते आहे. एकूण ८७७ लघू मध्यम मोठ्या प्रकल्पांसह बंधाऱ्यांमधील उपयुक्त पाणीसाठा ४१ टक्क्यांवर आला असून ४२ लघू-मध्यम प्रकल्प आताच कोरडेठाक पडले आहेत. यामध्ये ४० लघू तर दोन मध्यम प्रकल्पांचा समावेश आहे.

मराठवाड्यातील अकरा मोठ्या प्रकल्पात ४७.३६ टक्के, ७५ मध्यम प्रकल्पात केवळ २७.२२ टक्के, ७४९ लघू प्रकल्पात २८.४६ टक्के, गोदावरी नदीवरील १५ बंधाऱ्यात ४०.८ टक्के तर तेरणा मांजरा रेणा नदीवरील २७ बंधाऱ्यांमध्ये केवळ ५४ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

मोठे प्रकल्पांतील स्थिती

मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांपैकी जायकवाडी ३९ टक्क्यांवर आले असून बीडमधील माजलगाव प्रकल्पात केवळ ६ टक्के उपयुक्त पाणी साठा शिल्लक आहे.

याशिवाय मांजरा प्रकल्पात २४ टक्के, निम्न दुधना प्रकल्पात २१ टक्के, विष्णुपुरी ७० टक्के, निम्नमनार ६२ टक्के, येलदरी ५९ टक्के, सिद्धेश्वर ९१ टक्के, उर्ध्व पैनगंगा ७९ टक्के, निम्न तेरणा १७ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

मोठ्या प्रकल्पांपैकी सीनाकोळेगाव प्रकल्पात उपयुक्त पाण्याचा थेंबही शिल्लक नाही. ११ पैकी बीड व धाराशिव मधील प्रत्येकी दोन व परभणी मधील एक प्रकल्प मिळून पाच प्रकल्पात २५ टक्के पेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक आहे.

मध्यम प्रकल्पांची स्थिती

मराठवाड्यातील ७५ मध्यम प्रकल्पांपैकी धाराशिव मधील १७ प्रकल्पात सर्वात कमी १३ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्या पाठोपाठ परभणीतील दोन प्रकल्पात १८ टक्के, जालनामधील ७ प्रकल्पात १५ टक्के, छत्रपती संभाजीनगरमधील १६ प्रकल्पात २३ टक्के, लातूरमधील ८ प्रकल्पात २४ टक्के, बीडमधील १६ प्रकल्पात ३८ टक्के, तर नांदेडमधील ९ प्रकल्पात ५५ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. गत तीन वर्षातील आजच्या घडीचा हा सर्वात कमी पाणीसाठा आहे धाराशिव व बीड मधील प्रत्येकी एक मिळून दोन मध्यम प्रकल्प कोरडे पडले आहेत.

लघू प्रकल्पांची स्थिती

७४९ लघू प्रकल्पांपैकी जालन्यातील ५७ लघू प्रकल्पात सर्वात कमी ६ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्या पाठोपाठ परभणीमधील २२ प्रकल्पात १२ टक्के, बीडमधील १२६ प्रकल्पात २४ टक्के, छत्रपती संभाजीनगरमधील ९८ प्रकल्पात २५ टक्के, लातूरमधील १३४ प्रकल्पात २६ टक्के, हिंगोलीतील २७ प्रकल्पात ६९ टक्के तर नांदेडमधील ८० प्रकल्पात सर्वाधिक ८७ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. छत्रपती संभाजीनगर व बीड मधील प्रत्येकी ९, लातूरमधील तीन व धाराशिवमधील १९ मिळून ४० लघू प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Procurement Date Extension : कापूस खरेदीला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ; शेतकऱ्यांसाठी सीसीआयचा महत्वाचा निर्णय

Sugarcane FRP: ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ४,६०१ कोटी एफआरपी थकीत, ४५ कारखाने रडारवर

Raisin Export: बेदाणा निर्यात ८१ टक्क्यांनी घटली, द्राक्ष उत्पादक संकटात; सरकारची कबुली

Bageshwari Lake: बागेश्वरी तलाव परिसर पर्यटनाचे नवे केंद्र

Maize Procurement: मक्याचे दर घसरले; २५ हजार क्विंटल खरेदीवर ब्रेक

SCROLL FOR NEXT