Water Scarcity : पारनेर तालुक्यासाठी पाणीटंचाई आराखडा तयार

Drought Condition : पारनेर तालुक्यातील आगामी काळातील दुष्काळी स्थितीचा विचार करता तालुक्यातील ७२ गावांत पाणीटंचाई भासणार आहे, असा अंदाज आहे. तशा आशयाचा पाणीटंचाईचा आराखडा तयार केला आहे.
Water Scarcity
Water ScarcityAgrowon
Published on
Updated on

Nagar News : तालुक्यातील आगामी काळातील दुष्काळी स्थितीचा विचार करता तालुक्यातील ७२ गावांत पाणीटंचाई भासणार आहे, असा अंदाज आहे. तशा आशयाचा पाणीटंचाईचा आराखडा तयार केला आहे.

त्यासाठी सुमारे पाच कोटी आठ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आलेला आहे. आता जिल्हाधिकाऱ्यांकडून त्याला कधी मंजुरी मिळते, याची प्रतीक्षा लागली आहे.

गेल्या तीन वर्षांत तलुक्यातील पाणीटंचाई भासणारी गावे कोणती व याही वर्षी कोणत्या गावात पाणीटंचाई भासू शकते, यावरून हा आराखडा तयार करण्यात आला आहे. तालुक्यात यंदाही अतिशय कमी प्रमाणात पाऊस झाल्याने अनेक गावांत लवकरच पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार आहे. त्यानुसार आगामी काळातील पाणीटंचाईचे तीन टप्पे तयार केले आहेत.

Water Scarcity
Pune Water Scarcity : पुणे विभागात पाणीटंचाई कायम

पहिल्या टप्पा ऑक्टोबर ते डिसेंबर हा कालवधी गृहीत धरून करण्यात आला आहे. तालुक्यातील कान्हूर पठार, पिंपळगाव तुर्क, वेसदरे, भोंद्रे, विरोली व पिंपरी पठार या सहा गावांचा समावेश असून त्यासाठी चार टँकरची गरज भासणार आहे असे, गृहीत धरले आहे.

दुसरा टप्पा जानेवारी ते मार्चअखेर गृहीत धरला आहे. या काळात तालुक्यातील ७० गावे व ३१४ वाड्या-वस्त्यांना पाणीटंचाई जाणविण्याची शक्यता आहे. त्यासाठी ४९.५० टँकरची गरज भासणार आहे.

Water Scarcity
Water Scarcity : कसमादेत पाणीटंचाई दिवसागणिक तीव्र होणार

तिसरा टप्पा एप्रिल ते जून असा असून याही काळात वरीलप्रमाणे ७० गावे व ३१४ वाड्या-वस्त्यांना पाणीटंचाई भासणार आहे. वरील प्रमाणेच ४९.५० टँकर किंवा त्यापेक्षा अधिक टँकरची गरज भासणार आहे. त्यामुळे तालुक्यात पिण्याच्या पाण्यावर आगामी काळात सुमारे पाच कोटी आठ लाख रुपये खर्च अपेक्षित आहेत. तसा अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात आला आहे.

कूपनलिकांचे अधिग्रहण होणार

टंचाई काळात तालुक्यात मांडओहळ धरण, शिरापूर व कोहकडी हे प्रमुख उदभव आहेत. या शिवाय गरज भासल्यास काळू प्रकल्पामधूनही पाणी उचलता येणार आहे, तसेच गावोगाव गरजेनुसार कूपनलिका सुद्धा अधिग्रहीत केल्या जाणार आहेत.

पाणीटंचाईचा अंदाजित आराखडा उपअभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग व प्रांताधिकारी या सर्वांच्या मान्यतेनंतर जिल्हाधिकारी यांच्याकडे मान्यतेसाठी जाणार आहे. त्यानंतर त्या अंदाजपत्रकास मान्यता मिळणार आहे.
ज्योत्स्ना मुळीक, गटविकास अधिकारी, पारनेर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com