Water Crisis Agrowon
ॲग्रो विशेष

Water Crisis : पाण्याची बचत अन् काटकसर ही काळाची गरज

Water Scarcity : सध्याच्या पाणीटंचाईच्या परिस्थितीत प्रत्येकाने पाण्याच्या वापराबाबत जागरूक होणे आवश्यक आहे.

Team Agrowon

Latur News : सध्याच्या पाणीटंचाईच्या परिस्थितीत प्रत्येकाने पाण्याच्या वापराबाबत जागरूक होणे आवश्यक आहे. पाण्याची बचत आणि काटकसरीने वापर ही काळाची गरज आहे, असे मत पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केले.

जलसंपदा विभागाच्या वतीने गुरुवारी (ता. १) आयोजित जल व्यवस्थापन कृती पंधरवडाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. आमदार संजय बनसोडे, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, लातूर शहर महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त देविदास जाधव, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंता तसेच प्रशासक रूपाली ठोंबरे, कार्यकारी अभियंता अमरसिंह पाटील, महेंद्र काळे, रोहित जगताप यांच्यासह लातूर पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

पाण्याचे महत्त्व आपल्या सर्वांना माहीत आहे. मात्र पाण्याची बचत आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर, यासाठी जलव्यवस्थापन महत्त्वाचे आहे. जलसंपदा विभागाने या पंधरवड्यात राबवलेल्या विविध उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये पाण्याच्या वापराबाबत जागृती निर्माण होण्यास मदत होईल, असे पालकमंत्री भोसले म्हणाले.

काही जिल्ह्यांमध्ये शेतीसाठी पाण्याचा अतिवापर झाल्याने जमीन क्षारपड होत आहे. त्यामुळे शेतीमध्ये पाण्याचा योग्य वापर व्हावा यासाठी ठिबक सिंचन आणि तुषार सिंचनासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे गरजेचे आहे. जल व्यवस्थापन कृती पंधरवड्यांतर्गत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केलेले मार्गदर्शन उपयुक्त ठरेल, असा विश्‍वास भोसले यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाची सुरुवात जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या जलपूजनाने झाली. जल व्यवस्थापन कृती पंधरवड्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांचा या वेळी सन्मान करण्यात आला. तसेच उपस्थितांना जल संवर्धन व बचतीची शपथ देण्यात आली. कार्यकारी अभियंता महेंद्र काळे यांनी प्रास्ताविकात पंधरवड्यात जिल्ह्यात राबवलेल्या उपक्रमांची माहिती सादर केली. यासंबंधीची चित्रफीत या वेळी दाखवण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heavy Rain Damage: अतिवृष्टिबाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत द्या

Crop Insurance: परभणी, हिंगोली जिल्ह्यांत ६ लाख ७ हजारांवर अर्ज

Aerogel: खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर करणारा एअरोजेल विकसित

Cotton Farming: जमिनीची ताकद वाढवून कापूस उत्पादनवाढ

Indian Language: भाषा मरता देशही मरतो...

SCROLL FOR NEXT