
Nashik News : पालखेड कालव्यातून साठवण तलावात १२० दिवसांसाठी घेतलेले पाणी ५० ते ५५ दिवस पुरत आहे. किंबहुना तीन दिवसांचे पाणी एकच दिवस पुरत आहे. २० ते २२ दशलक्ष घनफूट पाण्याची गळती होत असून १० ते १२ दशलक्ष घनफूट पाणी उपयोगात येत असल्याचा अंदाज आहे.
कधी तीन, कधी चार, तर कधी पाच दिवसांआड पाणीपुरवठा शहरासाठी नित्याचाच झाला आहे. यावर पर्याय चर्चेत येतात; पण उपाययोजनेच्या नावाने शंखोबा आहे. विशेष म्हणजे, शहरासाठी ९७ एकरांचा साठवण तलाव तयार झाला. त्यात पिण्यासाठी पालखेड डाव्या कालव्यातून घेतलेले पाणी सुमारे १२० दिवस पुरायला हवे.
ते तलावातून होणारी गळती आणि बाष्पीभवनामुळे ५५ दिवसांच्या आसपासच पुरते. त्यातच तलावाच्या आजूबाजूला विहिरीचा सपाटा सुरू असून, त्यातून वारेमाप उपसा होतो. मात्र, गळती आणि पाणी उपशावर कोणी बोलायला व तलावाच्या अस्तरीकरणासाठी पुढाकार घ्यायला तयार नसल्याने शहरावरची टंचाईची साडेसाती वर्षानुवर्षे ‘जैसे थे’च आहे.
टप्पा क्र. दोनच्या योजनेंतर्गत शहरातील पाणीपुरवठ्यासाठी जुन्या गंगासागर तलावाशेजारी ९७ एकरांचा तलाव करण्यात आला आहे. या योजनेमुळे शहराला रोजचा पाणीपुरवठा नशिबी येईल असे वाटले होते पण तसे झालेले नाही. या साठवण तलावातून प्रचंड प्रमाणात गळती होऊन हे पाणी आजूबाजूला बड्याच्या विहिरीत जाते. पूर्वी ही संख्या १०८ होती, मात्र आज २०० वर विहिरी झाल्या असून काहींनी येथून १० ते १५ किलोमीटरपर्यंत पाईपलाईन करून शेतीसाठी पाणी नेले आहे.
तलावाचे काँक्रिटीकरण का नाही?
पालखेड विभागाला लाखो रुपये देऊन घेतलेल्या पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होत असेल तर या ९७ एकराच्या तलावाचे काँक्रिटीकरण किंवा प्लॅस्टिक अस्तरीकरण का होत नाही, हा सर्वसामान्य येवलेकरांना पडलेला प्रश्न आहे. विकासाचे निर्णय घेणाऱ्यांना हे पाणी हवे असते का? त्यामुळेच असा काही शाश्वत निर्णय होत नाही का? हे प्रश्न नागरिकांसाठी अनुत्तरितच आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.