Health Problem Agrowon
ॲग्रो विशेष

Health Problem : चिखलदरा तालुक्यातील मोथा येथे जलजन्य आजाराची लागण

Water Pollution : चिखलदरा तालुक्यातील मोथा गावात दूषित पाण्यामुळे साथरोगाची लागण झाली आहे. अशुद्ध पाणी प्यायल्याने गावातील २५ ते ३० नागरिक आजारी पडले असून त्यांच्यावर सोमवारपासून (ता. ५) उपचार सुरू आहेत.

Team Agrowon

Amravati News : तालुक्यातील मोथा गावात दूषित पाण्यामुळे साथरोगाची लागण झाली आहे. अशुद्ध पाणी प्यायल्याने गावातील २५ ते ३० नागरिक आजारी पडले असून त्यांच्यावर सोमवारपासून (ता. ५) उपचार सुरू आहेत. दुसरीकडे आरोग्य विभाग तसेच ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या दाव्यांची पोलखोल यानिमित्ताने झाली आहे.

दरवर्षी चिखलदरा तालुक्यातील अनेक गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण होत असते. अनेक गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर येते. ग्रामस्थांना गावाबाहेरून पाण्याची सोय करावी लागते, अशी परिस्थिती दरवर्षीच राहते.

यंदाही हीच परिस्थिती असून, मोथा गावात दूषित पाण्यामुळे जलजन्य आजार उद्‍भवला आहे. गावातील काही नागरिकांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर काहींनी खासगी रुग्णालयाची वाट धरली आहे.

सोमवारपासून (ता. ५) ११ रुग्ण चिखलदरा ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असल्याचे ग्रामीण रुग्णालय अधीक्षकांनी सांगितले. रुग्णांना संडास, उलटी, ताप, चक्कर येणे अशा प्रकारची लक्षणे आढळून आली आहेत. मोथा या गावाची लोकसंख्या पंधराशे ते सतराशेच्या घरात असून गटग्रामपंचायत आहे.

गावात पाण्याचे छोटे स्रोत आहेत. मात्र संबंधित विभागाने त्या पाण्याच्या स्रोतांमध्ये ब्लिचिंग पावडर वगैरे न टाकल्यामुळे साथरोगाची लागण झाली असावी, असा नागरिकांचा आरोप आहे. आरोग्य विभागाने आता तरी ही बाब गंभीरतेने घेत गावातील जलस्रोतांचे नमुने घेण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

दूषित पाणी पिण्यात आल्यामुळे मोथा गावातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झाला असून, १० ते १२ रुग्णांवर ग्रामीण रुग्णालय, चिखलदरा येथे उपचार सुरू आहेत. आपण त्यांच्याशी बोललो असून, आम्ही गावातील टँकर व विहिरीचे पाणी पितो त्यामुळेच झाले असावे, असे त्यांनी सांगितले. तसेच सध्या रुग्ण बरे होत आहेत. सद्यःस्थिती नियंत्रणात आहे.
संजय पवार, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pomegranate Farming: जमीन सुपीकता, काटेकोर खत व्यवस्थापनावर भर

Ladaki Bahin Yojana: लाडक्या बहिणींकडून ६,८०० कोटींची वसुली होणार; योजनेत ४२ लाख अपात्र लाभार्थी 

Star Campus Award: ‘अर्थ डे नेटवर्क’तर्फे मुक्त विद्यापीठास ‘स्टार कॅम्पस अॅवॉर्ड’ 

Onion Farmers: कांद्यासाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना करा

Sugarcane Crushing Season: आगामी गाळपासाठी एक लाखावर हेक्टर ऊस

SCROLL FOR NEXT