Jaltara Project Agrowon
ॲग्रो विशेष

Jaltara Project : वाशीममध्ये जलतारा निर्मिती मिशन मोडवर

Water Conservation : पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी आणि भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी जलतारा ही उपाययोजना प्रभावी ठरत असल्याचा दावा केला जातो.

Team Agrowon

Washim News : जिल्ह्यात जलसंधारण आणि पाणलोट क्षेत्र विकासासाठी ‘जलतारा’ (शोषखड्डा) निर्मितीच्या कामांना गती मिळाली असून, सध्या ही कामे ‘मिशन मोड’वर राबवली जात आहेत. जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून आणि शेतकरी व ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागाने आतापर्यंत १५ हजारांहून अधिक जलतारा कामे यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली आहेत.

पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी आणि भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी जलतारा ही उपाययोजना प्रभावी ठरत असल्याचा दावा केला जातो. या कामांमुळे भविष्यात शेतकऱ्यांना सिंचनासाठी अधिक पाणी उपलब्ध होईल. परिणामी, कृषी उत्पादनात वाढ होऊन शाश्वत शेतीच्या दिशेने जिल्ह्यात एक मोठे पाऊल पुढे पडू शकेल.

त्यामुळे गेल्या काही दिवसांत जलतारा निर्मितीवर विशेष भर देण्यात आला असून, यासाठी विविध विभागांचे सहकार्य लाभत आहे. या उपक्रमामुळे पाणीटंचाईची समस्या कमी होईल. तसेच आज गावोगावी जलसाक्षरतेची चळवळही निर्माण होत आहे. अनेक शेतकरी आता स्वतःहून जलसंधारणाच्या या उपक्रमात सहभागी होत आहेत. वाशीम जिल्हा जलसंधारणात राज्यात आदर्शवत काम करीत आहे.

‘कॉटन कनेक्ट’चाही पुढाकार

जलतारा निर्मितीच्या कामामध्ये प्रशासनासह स्वयंसेवी संस्था देखील पुढाकार घेत आहेत. ‘कॉटन कनेक्ट’ या संस्थेच्या माध्यमातून तामसाळा गावासाठी कामे करण्यासाठी जेसीबी मशिन उपलब्ध करून देण्यात आले आहे. या यंत्राद्वारे कामास शुक्रवारी (ता. ९) जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शाह यांच्या हस्ते प्रारंभ झाला.

या वेळी उपविभागीय कृषी अधिकारी संतोष वाळके, ग्राम महसूल अधिकारी रेखा पटुकले, तसेच गावाचे वॉटर हिरो उपस्थित होते. तामसाळा गावाचे एकूण क्षेत्र १३०० एकर आहे. आतापर्यंत या गावात ४०० शोषखड्डे (जलतारे) पूर्ण झाले असून, उर्वरित ९०० खड्ड्यांची निर्मिती येत्या १० दिवसांत पूर्ण करण्याचे गावकऱ्यांचे नियोजन आहे.

१५ हजारांवर कामे पूर्ण

जिल्ह्यात विविध तालुक्यांमध्ये आजवर जवळपास १५ हजारांवर जलतारा कामे पूर्ण झाली आहेत. विशेष म्हणजे, त्यापैकी ७६६५ कामांचे जिओ-टॅगिंग झाल्याची माहिती उपविभागीय कृषी अधिकारी संतोष वाळके यांनी दिली.

तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे

कारंजा १७२६

वाशीम २१४५

रिसोड १५४७

मानोरा ५३५

मंगरूळपीर १०३२

मालेगाव ६८०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Local Body Election : ‘झेडपी’, पंचायत समित्यांचा बिगुल

Fertilizer Shortage : युरिया, डीएपीचा तुटवडा, लिंकिंगने शेतकरी त्रस्त

Ginger Research Center: आले संशोधन केंद्राचा पेच; कृषिमंत्र्यांच विधानपरिषदेत बैठकीचं आश्वासन 

Silk Market : बीड रेशीम कोष बाजारात शेतकऱ्यांचे शोषण

Turmeric Market : नांदेडला हळदीचे चुकारे थकल्याने लिलाव पाडले बंद

SCROLL FOR NEXT