Hailstorm Forcast Agrowon
ॲग्रो विशेष

Weather Update : विदर्भात गारपीट, वादळी पावसाचा इशारा

Weather News : मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज

Team Agrowon

Rain Alert : पुणे : राज्यात उन्हाच्या चटक्याने काहिली वाढली असतानाच विदर्भात वादळी पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. ९) विदर्भात गारपिटीसह वादळी पावसाचा इशारा आहे. अमरावती आणि वर्धामध्ये गारपीट वादळी पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे.
विदर्भात पूर्वमोसमी पावसाच्या ढगांची छाया पसरताच उन्हाचा चटका कमी अधिक होऊ लागला आहे. चंद्रपूर, यवतमाळ आणि गोंदिया जिल्ह्यांत वादळी पावसाने हजेरी लावली आहे.

बुधवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील अकोला येथे ४३.७ अंश तापमान नोंदले गेले. तर मालेगाव, वाशीम, वर्धा येथे ४३ अंश व त्यापेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. राज्यात उन्हाचा चटका तापदायक ठरत असून, उकाड्यामुळे घामटा निघत आहे. उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे.
ईशान्य राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, त्यापासून मध्य महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक ते दक्षिण अंतर्गत कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. ईशान्य अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. यामुळे वादळी पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. ९) विदर्भात वादळी वारे, गारपिटीसह पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळण्याचा इशारा आहे. अमरावती, वर्धा जिल्ह्यांत गारपिटीचा इशारा (ऑरेंज अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. मराठवाड्यातही विजांसह पावसाची शक्यता आहे.

बुधवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
पुणे ३९.३, धुळे ४२.५, जळगाव ४२, कोल्हापूर ३७.६, महाबळेश्‍वर ३२.१, मालेगाव ४३.६, नाशिक ३८.३, निफाड ३८.८, सांगली ३९.२, सातारा ३९.१, सोलापूर ४२.२, सांताक्रूझ ३३.७, डहाणू ३४.४, रत्नागिरी ३२.८, छत्रपती संभाजीनगर ४०.८, बीड ४१.८, नांदेड ४२, परभणी ४२, अकोला ४३.७, अमरावती ४२.८, बुलडाणा ४०.२, ब्रह्मपुरी ३८.९, चंद्रपूर ४२.४, गडचिरोली ३५, गोंदिया ३७, नागपूर ३८.१, वर्धा ४३, वाशीम ४३.४, यवतमाळ ४२.५.


वादळी पाऊस, गारपिटीचा इशारा. (ऑरेंज अलर्ट) :
अमरावती, वर्धा.

वादळी पाऊस, गारपिटीचा इशारा. (येलो अलर्ट) :
वाशीम, नागपूर, यवतमाळ.

वादळी पावसाचा इशारा. (येलो अलर्ट) :
बुलडाणा, अकोला, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया.

४३ अंशांपेक्षा अधिक कमाल तापमान असलेली ठिकाणे :
अकोला ४३.७, मालेगाव ४३.६, वाशीम ४३.४, वर्धा ४३,

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT