वर्धा : महिला बचतगटांना (Women's self-help groups) बॅंकांच्या कर्जाचा (Bank Loan) मोठा आधार असतो. गेल्यावर्षी जिल्ह्यात विविध बॅंकांना कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. उद्दिष्टापेक्षा अधिक म्हणजे ८६२७ गटांना तब्बल १८२ कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. हे कर्जवाटप राज्यात अव्वल ठरले आहे.
महिलांना सक्षम (Empower women) करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या (Center and State Government) वतीने जिवनोन्नती अभियान राबविण्यात येत आहे. अभियानांतर्गत पात्र बचतगटांना दरवर्षी कर्ज (Self- help Groups Loan) वाटप केले जाते. या कर्जातून महिला बचत गट वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय उद्योग सुरू करतात. यातून त्यांना चांगला आर्थिक फायदा होतो. जिल्ह्यात गेल्या वर्षी ९ हजार ३४० बचत गटांना १३७ कोटी रुपयांच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट बँकांच्या विविध शाखांना देण्यात आले होते.
२०२१-२२ या आर्थिक वर्षात मार्च अखेर विविध बँकांनी प्रत्यक्षात कर्ज वाटपासाठी निकषात बसणाऱ्या आणि पात्र ठरलेल्या ८ हजार ६२७ बचत गटांना १८२ कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप केले आहे. कर्जवाटपाची टक्केवारी १३३ इतकी असून राज्यात हे कर्ज वाटप सर्वाधिक आहे. जिवनोन्नती अभियानांतर्गत उद्योग व्यवसायासाठी (Industry Business) इच्छुक असणाऱ्या महिलांना सहजरित्या कर्ज उपलब्ध व्हावे म्हणून बँकांना उद्दिष्ट देऊन कर्ज वाटपासाठी प्रोत्साहित केले जाते. जिल्ह्यात जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बँकर्स समितीच्या बैठकीत या वाटपाचा सातत्याने पाठपुरावा घेण्यात येतो. कर्ज वाटप कमी असलेल्या बँकांना (Bank) दिलेल्या उद्दिष्टांइतके कर्ज वाटपाबाबत वारंवार निर्देशित केले जाते. त्यामुळे आणि बँकांच्या योगदानामुळे बचत गटांना राज्यातील सर्वाधिक कर्ज (Crop) वाटप होऊ शकले. कर्जवाटपात ८ हजार ६२७ गटांना १८२ कोटीचे वाटप करून जिल्हा अव्वल ठरला आहे.
कर्जाचे वाटप (Loan allocation)
विदर्भातील जिल्ह्यांमध्ये अकोला ४ हजार १२५ गटांना ६० कोटी, चंद्रपूर १० हजार ८३८ गटांना १७५ कोटी, नागपूर ८ हजार ५६९ गटांना १४६ कोटी, बुलडाणा ६ हजार १०१ गटांना १०१ कोटी, गडचिरोली ४ हजार ६२० गटांना ४१ कोटी, अमरावती ७ हजार २९५ गटांना ११९ कोटी, यवतमाळ ६ हजार ८४१ गटांना १३४ कोटी, गोंदिया ५ हजार २२६ गटांना १०१ कोटी, भंडारा ४ हजार ८५६ गटांना ७३ कोटी, वाशीम २ हजार ४७६ गटांना ४३ कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप करण्यात आले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.