Wanrain Bunds  Agrowon
ॲग्रो विशेष

Wanrai Bunds : मंगरूळ नवघरेमध्ये उभारला श्रमदानातून वनराई बंधारा

Water Conservation : तूर पिकाला संरक्षित सिंचनाची सोय करण्यासाठी कृषी विभागाने श्रमदानातून वनराई बंधारे उभारण्याची महत्त्वाकांक्षी मोहीम हाती घेतलेली आहे.

Team Agrowon

Buldana News : तालुक्यातील मंगरूळ नवघरे शिवारात कृषी विभागातर्फे लोकसहभागातून वनराई बंधारे उभारले जात आहेत. तूर पिकाला संरक्षित सिंचनाची सोय करण्यासाठी कृषी विभागाने श्रमदानातून वनराई बंधारे उभारण्याची महत्त्वाकांक्षी मोहीम हाती घेतलेली आहे.

मंगरूळ नवघरे येथे यंदा पडलेल्या अल्पशा पावसात सुद्धा जे नाले प्रवाहित आहेत, अशा नाल्यांवर वनराई बंधारे उभारण्याची मोहीम सुरु आहे. अर्जुन रामभाऊ डोके यांच्या शेतातील नाल्यामध्ये कृषी सहाय्यकाच्या मार्गदर्शनात श्रमदानातून वनराई बंधारा उभारण्यात आला.

यामध्ये या अडविलेल्या पाण्यामुळे किमान तीन ते चार हेक्टर क्षेत्रावर तुरीच्या पिकाला संरक्षित पाणी देता येईल. त्यामुळे तुरीच्या उत्पादनात निश्चित दहा ते पंधरा टक्क्यांपर्यंत वाढ होईल.

या प्रसंगी अर्जुन डोके, आत्माराम डोके, गणेश दांडेकर, राजू मोरे आदी शेतकरी उपस्थित होते. ज्या शेतकऱ्यांच्या शेतात प्रवाहित नाले असतील त्यांना श्रमदानातून वनराई बंधारे करावयाचे असल्यास त्यांना शास्त्रीय माहिती देण्यात येईल, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Relief Proposal: राज्याचा १५ हजार कोटींचा दुष्काळ मदत प्रस्ताव; कृषिमंत्री भरणेंची माहिती

Rain Forecast: चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यात पावसाची शक्यता

MAGNET Projects Delayed: चार वर्षांपासून ‘मॅग्नेट’चे प्रकल्प कागदावरच; पूर्व विदर्भात एकही प्रकल्प सुरू नाही

Finance Company Vandalism: फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांत तोडफोड; नांदेडमध्ये सक्तीच्या वसुलीविरोधात क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक

NDRF Assistance Norms: एनडीआरएफच्या मदतीच्या निकषांत केंद्र सरकारकडून वाढ; आपत्तीग्रस्तांना दिलासा

SCROLL FOR NEXT