Mankarwadi Lake Agrowon
ॲग्रो विशेष

Wakurde Irrigation Scheme : रेठरे धरण, मानकरवाडी तलावात सोडले वाकुर्डे बुद्रुकचे पाणी

Water Update : वाकुर्डे बुद्रुक योजनेचे पाणी लोकांच्या व शिराळा पाटबंधारे विभागाच्या मागणीनुसार रेठरे धरण व अंत्री बुद्रुक येथील मानकरवाडी तलावात सोडण्यात आले.

Team Agrowon

Sangli News : वाकुर्डे बुद्रुक योजनेचे पाणी लोकांच्या व शिराळा पाटबंधारे विभागाच्या मागणीनुसार रेठरे धरण व अंत्री बुद्रुक येथील मानकरवाडी तलावात सोडण्यात आले. पाण्याची पातळी वाढू लागल्याने या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

शिराळा व वाळवा तालुक्यातील अनेक ठिकाणची पिके वाळू लागली आहेत. त्यामुळे वाकुर्डे योजनेतून पाणी सोडावे, अशी मागणी शिराळा व वाळवा तालुक्यातील लोकांनी केली आहे. महिन्यापूर्वीही येथील तलावात पाणी सोडण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा मागणी केल्याने आठ दिवसांपूर्वी वाकुर्डे योजनेतून पाणी शिवपुरी येथे टंचाई जाणवू लागल्याने शिवपुरीसाठी प्रथम सोडण्यात आले होते.

मात्र, वाघवाडी हद्दीत पाणी येताच सहा दिवसांपूर्वी पाणीपुरवठा करणारी मुख्य वाहिनी काही लोकांनी फोडल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले होते. त्यामुळे शिवपुरीऐवजी मरळनाथपूर ते धुमाळवाडीकडे पाणी वळवण्यात आले होते.

दुरुस्तीनंतर पुन्हा शिवपुरीला पाणी सोडण्यात आले. काही प्रमाणात सिद्धेश्वर तलावात पाणीसाठा झाल्याने त्या ठिकाणचे पाणी बंद करून तीव्र टंचाईमुळे वाघवाडीच्या लोकांची मागणी आल्याने त्यांना पाणी सोडण्यात आले होते.

लोकांनी व पाटबंधारे विभागाने मागणी केल्यानुसार वाघवाडीला सोडलेले पाणी बंद करून ते गुरुवारपासून रेठरे धरण व अंत्री बुद्रुक येथील मानकरवाडी तलावात सोडण्यात आले. त्यामुळे परिसरातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार असून सुरूल ओझर्डे परिसरात पाणी सोडण्यात येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Relief : दुष्काळ निवारणात कसूर केल्यास कारवाई

Mula Canal Breach : चांद्याजवळ मुळा उजव्या कालव्याचा भराव खचला

Fodder Management : पिण्याचे पाणी, चाऱ्याचे तातडीने नियोजन करा

Land Acquisition: भूमी अधिग्रहण कायदा रद्द करा : लक्ष्मीकांत कौठकर

Soil Moisture: दुष्काळाच्या परिस्थितीत मातीतील ओलावा कसा टिकवावा?

SCROLL FOR NEXT