Girna River  Agrowon
ॲग्रो विशेष

Girna River Bridge : बांभोरी निमखेडीदरम्यान पूल, बंधाऱ्याची प्रतीक्षा

River Bridge : सार्वजनिक बांधकाम विभागाने मध्यंतरी केवळ पुलाच्या कामाचा घाट घातल्याची तक्रार होती. या कामासाठी मध्यंतरी निविदा स्वीकारण्यात आल्या असून, त्यामुळे पूलवजा बंधाऱ्याचा प्रस्ताव बाद ठरेल.

Team Agrowon

Jalgaon News : जळगाव शहरानजीक गिरणा नदीवर बांभोरी-निमखेडीला जोडणारा पूलवजा बंधाऱ्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. परंतु हा पूलवजा बंधारा केव्हा तयार होईल, याची प्रतीक्षा आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने मध्यंतरी केवळ पुलाच्या कामाचा घाट घातल्याची तक्रार होती.

या कामासाठी मध्यंतरी निविदा स्वीकारण्यात आल्या असून, त्यामुळे पूलवजा बंधाऱ्याचा प्रस्ताव बाद ठरेल. विद्यापीठासह संपूर्ण परिसर पाण्याच्या स्रोतापासून वंचित राहणार आहे. बंधाऱ्याच्या कामास बांधकाम विभाग टाळाटाळ करीत असल्याचा दावाही करण्यात आला होता.

जळगावलगत दहा किलोमीटर अंतरात गिरणा नदीचे पात्र आहे. या नदीवर सध्या बांभोरी गावाजवळ पूल आहे. चौपदरीकरणात पाळधीपासून बायपास गेल्याने त्याचे काम सुरू असून, त्यावरील पूल व रस्त्याचे काम अपूर्ण आहे. तोपर्यंत त्या पुलावरूनच अवजड वाहतूक सुरू असून, पुलाखालच्या वाळूउपशाने पुलाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे जुन्या महामार्गावर हा पूलवजा बंधारा प्रस्तावित करण्यात आला होता. परंतु त्याचे काम झालेच नाही.

सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत राष्ट्रीय महामार्ग सहापासून बांभोरी, निमखेडी, जळगाव, आसोदा, भादली या प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक ५९ वर किलोमीटर ४/५०० येथे मोठा पूलवजा बंधारा जोडरस्त्यासह बांधकामासाठी शासनाने ४० कोटींच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता दिली होती.

बंधारा केल्यास फायदे

पुलासोबत साडेचार ते पाच मीटरचे प्रचलित तंत्रज्ञानानुसार लोखंडी स्वयंचलित दरवाजे उभारल्यास गिरणा नदीत या बंधाऱ्यापासून कांताई बंधाऱ्यापर्यंत पाणीसाठा होऊ शकेल

गिरणा नदीपात्रातील साठ्यामुळे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संकुल, श्रमसाधना, अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच बऱ्याच शैक्षणिक संकुलांना पाणी उपलब्ध होईल

जळगाव तालुक्यातील पिंप्राळा, सावखेडा, निमखेडी व परिसर, धरणगावातील बांभोरी, टाकरखेडा, वैजनाथ, भोकनी, आव्हाणी आदी भागांस लाभ होईल. तसेच ग्रामीण पाणीपुरवठा व जळगाव शहराच्या काही भागांसाठी शाश्वत स्रोत उपलब्ध होईल

केवळ पुलाच्या कामाचा घाट

बंधारावजा पूल मंजूर असताना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केवळ पुलाच्या कामाचा घाट घातला जात आहे. त्यासाठी बांधकाम विभागाने निविदा मागवल्या, तीन निविदा स्वीकारण्यात आल्या आहेत, असाही आरोप काही लोकप्रतनिधींनी केला होता.

यात बांधकाम विभागाने परस्पर पुलाच्या कामाचा घाट घातल्याने बंधारा होऊ शकणार नाही. परिणामी, जळगाव शहर तसेच परिसरातील अनेक भाग पाण्याच्या मुख्य स्रोतापासून वंचित राहतील, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : सातारा जिल्ह्यात खरीप पेरणी अंतिम टप्प्यात

Farmer Felicitation : ‘सीसीआरआय’च्या वर्धापन दिनी प्रयोगशील शेतकऱ्यांचा गौरव

Melghat Water Scarcity : मेळघाटच्या पाणीटंचाईला ब्रेक

Nanded Water Stock : नांदेडमधील पाणीसाठा ३१ दलघमीने वाढला

Automated Weather Station : सांगलीत स्वयंचलित हवामान केंद्रासाठी ६९६ गावांत चाचपणी

SCROLL FOR NEXT