Sugarcane Harvester Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Payment : सांगली जिल्ह्यात ऊस बिलांची प्रतिक्षा

Sugarcane Season : सोळा कारखान्यांनी २४ लाख ९८ हजार टन उसाचे गाळप केले असून २३ लाख ५२ हजार लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गाळप सुरु करून सुमारे दोन महिन्यांचा कालावधी झाला. मात्र, काही साखर कारखान्यांनी उसाची बिले अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली नाहीत.

सोळा साखर कारखान्यांकडे ६०० कोटींची बिले थकल्याने ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. पावसाअभावी खरीप हातातून गेला असल्याने पीककर्जासह इतर देणी कशी परत फेड करायची असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

जिल्ह्यातील १६ साखर कारखान्यांनी नोव्हेंबरच्या पहिल्या गाळप हंगाम सुरु केले आहे. सोळा कारखान्यांनी २४ लाख ९८ हजार टन उसाचे गाळप केले असून २३ लाख ५२ हजार लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.

या कारखान्यांकडे सुमारे ६०० कोटीची रुपयांची ऊसबिले थकली आहेत. ऊस गाळपास गेल्यानंतर चौदा दिवसांत बिल जमा करणे बंधनकारक आहे, परंतु कारखान्यांनी ऊस दर नियंत्रण कायद्याचे उल्लंघन केले असल्याचे संघटनांनी म्हटले आहे.

खरिपासह ऊस लागवडींकरिता शेतकऱ्यांनी सहकारी बॅंक, सोसायटी, खासगी बॅंकेकडून कर्ज घेतले आहे. ऊस बिले अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली नसल्याने कर्जाची परत फेड कशी करायची आणि येणाऱ्या उन्हाळी हंगामासाठी लागणारा पैसा कसा उभारायचा असा सवाल शेतकरी उपस्थित करू लागला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT