Shirol Flood agrowon
ॲग्रो विशेष

Shirol Flood : एका कृषी सहायकाकडे ३ गावं, महापुराने बाधित पंचनाम्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

Flood Panchnama Villages कोल्हापूर जिल्ह्यात महापुरामुळे शिरोळ तालुक्यातील ४४ गावांना मोठा फटका बसला.

sandeep Shirguppe

Kolhapur Agriculture Flood Damage : कोल्हापूर जिल्ह्यात महापुरामुळे शिरोळ तालुक्यातील ४४ गावांना मोठा फटका बसला. तालुक्यात पंचनाम्याला सुरुवात झाली आहे, परंतु एका कृषी सहायकाकडे दोन ते तीन गावे असल्याने तालुक्यातील अनेक गावांमध्ये अद्याप पंचनाम्याला सुरुवातच झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

५३ गावांपैंकी ४४ गावे पूरबाधित झाली असून, तहसीलदार अनिलकुमार हेळकर, गटविकास अधिकारी नारायण घोलप, तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत जांगळे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामे सुरू आहेत.

परंतु, एका कृषी सहायकाकडे २ ते ३ गावे आहेत. अशात अनेक गावांत ग्रामसेवकांना ग्रामपंचायतीचे काम, घरांची पडझड, गोठे पडझडीची पाहणी करून पंचनामे करावे लागत आहेत.

तलाठ्यांना पूरग्रस्तांच्या भरपाईबाबतचा अहवाल व पंचनामे याचीही कामे आहेत. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांत अद्याप पंचनाम्याला सुरुवात झालेली नाही. नांदणी, धरणगुत्तीसह अनेक गावांना पंचनाम्याची प्रतीक्षा आहे. तालुका कृषी अधिकाऱ्यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांकडे कृषी अधिकारी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. मात्र, प्रशासनाकडून अद्यापही उपलब्ध झालेले नाहीत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

Delhi University Election: शितावरून भाताची परीक्षा

Maharashtra Drought Situation: दुष्काळदाहातील बेपर्वाई

Sangli APMC: सांगली बाजार समिती त्रिभाजनासाठी मुदतवाढ

SCROLL FOR NEXT