Local Body Election Agriculture
ॲग्रो विशेष

Local Body Election : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची प्रतीक्षा

ZP Election : खानदेशात जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व महापालिका निवडणुकांच्या कार्यक्रमाची प्रतीक्षा आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व महापालिका निवडणुकांच्या कार्यक्रमाची प्रतीक्षा आहे. बाजार समित्या, जळगाव जिल्ह्यातील दूध संघ व जिल्हा बँकेच्या निवडणुका मध्यंतरी प्रशासनाने घेतल्या. पण जळगाव जिल्हा परिषदेत अडीच वर्षे प्रशासकराज आहे. निवडणूक कार्यक्रम केव्हा जाहीर होईल, याची सर्वांना प्रतीक्षा आहे.

जळगाव जिल्हा बँक व जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मार्यादित या संस्थांच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष होते. त्या निवडणुका मागील दोन वर्षांत झाल्या. या संस्थांमध्ये सत्ता स्थापन झाली असून, कामेही रेटली जात आहेत.

लोकप्रतिनिधी किंवा शेतकरी प्रतिनिधी या संस्थांत आहेत. पण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये संचालक, पदाधिकारी, सदस्यच नाहीत. जळगाव जिल्ह्यात १५ पंचायत समित्या आहेत. धुळ्यात पाच पंचायत समित्या आहेत. जळगाव महापालिका व धुळे पालिकेतही निवडणूक कार्यक्रम अपेक्षित आहे.

जळगाव जिल्ह्यातील १२ बाजार समित्यांची निवडणूक झाली व त्यात संचालक, सभापती कार्यरत आहेत. पण स्थानिक स्वराज्य संस्थांत प्रशासक कार्यरत आहेत. लोकप्रतनिधी नसल्याने या संस्थांमध्ये सरपंच, ग्रामस्थांचे थेट प्रश्न कुणी सोडवत नाही.

प्रश्न घेऊन सतत गटविकास अधिकारी, जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यकारी अभियंता यांच्याकडे जावे लागते. विधानसभा निवडणुकीनंतर लागलीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होतील, अशी अपेक्षा होती. परंतु अद्याप या निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत.

अडीच वर्षे प्रशासकराजचा कंटाळा

जिल्हा परिषदांत अडीच वर्षे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सर्व सूत्र राहण्याची वेळ अनेक वर्षांत जळगावात आली आहे. जळगाव जिल्हा परिषदेअंतर्गत ११५३ गावे, १५ पंचायत समित्या व ग्रामविकासाचा मोठा डोलारा कार्यरत आहे.

ग्रामविकासाचे मोठे केंद्र असलेल्या जिल्हा परिषदेत सदस्य, पदाधिकारी नसल्याचा मुद्दा सरपंच, ग्रामस्थ, कार्यकर्ते आपापले नेते यांच्याकडे उपस्थित करीत आहेत. प्रशासकराजचा कंटाळा आला आहे, असेही ग्रामीण स्तरावर कार्यरत कर्मचारी दबक्या आवाजात बोलत आहेत. परंतु यासंबंधीची कार्यवाही करण्यात येत नसल्याने अडचणी आहेत.

विविध पक्षांना आत्मविश्वास

विधानसभा निवडणुकीत महायुतीने सत्ता मिळविली. आघाडीचा सुपडा साफ झाला. आता स्थानिक स्वराज्य संस्थांत महायुती एकत्र राहील की सर्व स्वतंत्र लढतील, असाही मुद्दा आहे. मागील वेळेस जळगाव जिल्हा परिषदेतील सत्ता भाजपने एकहाती मिळविली होती. यंदा शिंदेगट काय भूमिका घेतो, याकडेही लक्ष लागले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Veterinary Hospitals: राज्यात ३५७ ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्यांना मिळणार नवीन इमारती

Donald Trump: भारत-पाक संघर्ष मीच थांबविला

Textile Industry: येवल्यातील पैठणी उद्योगाला मिळणार अधिक चालना

New Cooperative Societies: राज्यात सात हजार नव्या सोसायट्या स्थापन करा

Betel Leaf Rate: खाऊच्या पानांचे दर २०० ते ३०० रुपयांवर

SCROLL FOR NEXT