Election Voting list : गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाबाबत राज्य निवडणूक आयोगाने महत्वाचे संकेत दिले आहे. त्यामुळे बऱ्याच दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या महापालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूका लवकरच लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्य निवडणूक आयोगाने या संदर्भात एक परित्रपत्रक काढत मतदार याद्या तयार करण्यासाठी अधिसूचित करण्यात आली आहे.
राज्यातील जवळपास २ वर्षांपासून मुंबई, पुणेसह २३ महानगरपालिका तसेच २५ जिल्हा परिषदा, तसेच नगरपालिका, पंचायत समित्यांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. राज्यात सुरू असलेल्या सत्ता संघर्षात अनेक महिन्यांपासून निवडणुका रखडल्याने मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार प्रशासनाकडून केला जात आहे.
या स्थानिक स्वराज संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्याच्यावर सुनावणी सुरू असून त्याचा अंतिम निकाल होणे बाकी आहे. त्यात आता राज्य निवडणूक आयोगाने एक आधिसूचना काढली आहे. यामध्ये महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक तसेच पोटनिवडणुकींसाठी मतदार याद्या तयार करण्यासाठी अधिसूचित करण्यात येत असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.