Agriculture Agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Rain News : कोल्हापुरात पुरेशा पावसाची प्रतीक्षाच

Kolhapur Weather Update : कोल्हापूर जिल्ह्यात पाणलोट क्षेत्र वगळता इतर ठिकाणी अद्याप मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.

Rushikesh Kalange

Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात पाणलोट क्षेत्र वगळता इतर ठिकाणी अद्याप मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, राधानगरी धरण परिसरात मंगळवारी (ता. २७) केवळ २५ मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात ६५ ते १०० मिमी पाऊस होईल, असा अंदाज होता. मात्र हा अंदाज फोल ठरला आहे.

धरण क्षेत्रात अपेक्षित पाऊस नसल्याने पाणी साठ्यात धीमी वाढ आहे. जिल्ह्याच्या अन्य भागांत मात्र एक दोन तासांनी पाच-दहा मिनिटे रिमझिम सरी आणि पुन्हा ढगाळ वातावरण, अशी स्थिती दिसून येत आहे.

मंगळवारी (ता. २७) जिल्ह्यात दुपारी चारनंतर करवीर, पन्हाळा, शाहूवाडी तालुक्यात ढगाळ वातावरणामुळे जोरदार पाऊस होईल, अशी अपेक्षा होती. पण अद्याप समाधानकारक पाऊस झाला नाही. जिल्ह्यात अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा केली जात आहे. जेवढा पाऊस झाला, त्यावरच पेरण्या आटोपल्या जात आहेत. पण अनेक भागात त्यासाठीही गती नाही.

जिल्ह्यात आजअखेर तीस ते चाळीस टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यापूर्वी ज्या पेरण्या झाल्या आहेत. त्यांना सध्या सुरू असलेल्या तुरळक पावसाचा दिलासा मिळाला आहे. सध्या मॉन्सूनचे वातावरण झाले आहे. राज्यभर मॉन्सूनचे चित्र आहे पण म्हणावा तसा पाऊस न झाल्याने विशेष करून पूर्व भागातील शेतकरी अजूनही पेरण्या कराव्यात की नाही या विचारात आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Sowing: खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात भात पेरणी सुरू

Irrigation Water Crisis: इंदापुरात शेतकरी पाण्यासाठी आक्रमक

Wildlife Conservation: पाच एकर शेती वन्यजीवांसाठी राखीव

Ashadhi Wari 2026: तुकोबारायांच्या पालखीचे सात जुलैला प्रस्थान

Farm Loan Waiver: कर्जमुक्ती नव्हे, कर्जवसुली योजना

SCROLL FOR NEXT