Wagh Nakh Weapon  Agrowon
ॲग्रो विशेष

Wagh Nakh Weapon : प्रदर्शनात शनिवारपासून पाहता येणार वाघनखे

Chhatrapati Shivaji Maharaj Weapon : छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रतापगडावर केलेल्या शौर्याचे प्रतीक असलेली वाघनखे मुंबईहून साताऱ्यात बुधवारी (ता. १७) विशेष सुरक्षेत दाखल झाली.

Team Agrowon

Satara News : छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रतापगडावर केलेल्या शौर्याचे प्रतीक असलेली वाघनखे मुंबईहून साताऱ्यात बुधवारी (ता. १७) विशेष सुरक्षेत दाखल झाली. ही वाघनखे येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयातील सुरक्षा पेटीत ठेवण्यात आली आहेत. ही वाघनखे सात महिने सातारकरांना पाहता येणार आहेत.

शुक्रवारी (ता. १९) दुपारी सव्वाबारा वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित प्रदर्शनाचे उद्‌घाटन होणार आहे. तर शनिवारपासून (ता. २०) हे प्रदर्शन नागरिकांना पाहण्यासाठी खुले करण्यात येणार आहे.

शुक्रवारी कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री तथा उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई, खासदार उदयनराजे भोसले, माजी खासदार संभाजीराजे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदारांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदर्शनाचे उद्‌घाटन होणार आहे.

या वाघनखांच्या सुरक्षिततेसाठी बुलेटप्रूफ काचपेटी, तसेच मेटल डिटेक्टर, सीसीटीव्ही कॅमेरे, लेसर सेन्सर आदी यंत्रणा लावण्यात आल्या आहेत, तसेच पोलिस व बाहेरच्या एजन्सीकडे सुरक्षिततेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

इंग्लंडहून विशेष विमानाने वाघनखे महाराष्ट्रात आली. तेथून ती विशेष सुरक्षेत साताऱ्यात दाखल झाली. व्हिक्टोरिया ॲण्ड अल्बर्ट म्युझियमच लंडनचे आंतरराष्ट्रीय कार्यक्रम प्रमुख निकोलास मर्चंड हे देखील सोबत असतील.

या वाघनाखांची काळजी घेण्यासाठी ब्रिटनच्या म्युझियममधील एक केअर टेकर आले आहेत. सुरक्षिततेच्या कारणास्तव या वाघनखांची मिरवणूक काढण्यात येणार नसल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

सुरुवातीला सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषदेच्या ऑडिटोरियममध्ये कार्यक्रम सुरू होईल. दुपारी सव्वाबारा वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संग्रहालयात कार्यक्रम होईल. या वेळी शिवराज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल विशेष टपाल तिकिटांचे अनावरणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT