Election News Agrowon
ॲग्रो विशेष

Grampanchyat Election In Nandurbar : नंदुरबार जिल्ह्यात ८४ ग्रामपंचायतींच्या १११ जागांसाठी होणार मतदान

नंदुरबार जिल्ह्यातील एकूण ८४ ग्रामपंचायतींमधील विविध कारणांनी रिक्त झालेल्या १११ सदस्यांच्या जागांसाठी पोटनिवडणूक घेण्याचा आदेश निवडणूक आयोगाने निर्गमित केला आहे.

Team Agrowon

Nandurbar Election News : नंदुरबार जिल्ह्यातील एकूण ८४ ग्रामपंचायतींमधील विविध कारणांनी रिक्त झालेल्या १११ सदस्यांच्या जागांसाठी पोटनिवडणूक घेण्याचा आदेश निवडणूक आयोगाने निर्गमित केला आहे. त्यानुसार येत्या २५ एप्रिलपासून निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे ग्राम पंचायतीतील सदस्य, थेट सरपंचाच्या रिक्त झालेल्या जागांच्या पोटनिवडणूकांसाठी पारंपारिक पद्धतीने राबविण्यात यावयाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

निवडणूक आयोगाने तसे आदेश जिल्हा निवडणूक विभागाला दिले आहेत. त्यानुसार प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम ठरविण्यात आला आहे.

येत्या २५ एप्रिलपासून प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेस सुरवात होईल. त्यात २५ एप्रिल ते २ मे उमेदवारी अर्ज विक्री व स्वीकृती, ३ मे अर्जांची छाननी, ८ मेस माघारी व निवडणूक रिंगणातील उमेदवारांची यादी प्रसिद्ध करून चिन्ह वाटप करण्यात येणार आहे.

तर १८ मेस सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाचपर्यंत मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

तसेच, २४ मेस जिल्हाधिकारी यांनी ठरवून दिलेल्या ठिकाणी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.

यामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील एकूण ८४ ग्रामपंचायतींमधील एकूण १११ जागांचा समावेश आहे. त्यासंबंधीचे सूचना व आदेश तहसिलदारांना देण्यात आले आहेत.

नंदुरबार जिल्ह्यात थेट सरपंच निवड प्रक्रियेतील एकही सरपंचपदाची जागा रिक्त नाही. केवळ १११ जागा या ग्रामपंचायत सदस्यांच्या आहेत. त्यामुळे ही निवडणूक सदस्यपदासाठी होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune Fruit Market: उन्हाळी हंगामात फळे तेजीत

Education Reform: शिक्षणात सुधारणा ही सामूहिक जबाबदारी

Ethanol Fuel: इथेनॉल ठरेल पर्यायी इंधन

Namo Shetkari Mahasamman Yojana: ‘नमो’चा आठवा हप्ता पुढील आठवड्यात

Pune ZP: पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी वीरधवल जगदाळे

SCROLL FOR NEXT