Pune News : राज्यातील ५ व्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदानाला सोमवारी (ता.२०) सुरूवात झाली. ५ व्या टप्प्यात लोकसभेच्या १३ जागांसाठी मतदान होत आहे. महाराष्ट्रात धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण अशा मतदार संघांचा यात समावेश आहे.
सकाळी ९ वाजेपर्यंत ६.३३ टक्के मतदान पार पडले आहे. तर मुंबईसह या १३ जागांवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी सर्वस्व पणाला लावले असून मुंबई ईशान्य मुंबई मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या दोन कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांची निवडणूक ५ टप्प्यात विभागली गेली होती. यातील ५ व्या टप्प्यातील आज मतदान पार पडत आहे. तर १३ जागांपैकी ७ जागांवर भाजप आणि सहा जागांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे उमेदवार उभारले असून यांच्यासमोर महाविकास आघाडीचे तगडे आव्हान आहे.
येथे भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेच्या विरोधात काँग्रेसकडून तीन, राष्ट्रवादीकडून (शरदचंद्र पवार) दोन आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून उर्वरित ९ जागांवर उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले आहेत.
एकनाथ शिंदेंनी मतदानाचा हक्क बजावला
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किसननगर येथील मतदान केंद्रावर सह कुटूंब मतदानाचा हक्क बजावला. यावेळी वडील संभाजी शिंदे, पत्नी लता शिंदे, मुलगा व कल्याण लोकसभेचे उमेदवार श्रीकांत शिंदे उपस्थित होते.
मुंबईत कडेकोट बंदोबस्त
मुंबईसह राज्यातील १३ जागांवर चुरशीने मतदान होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी राज्यभरात कडक व्यवस्था केली आहे. तसेच मुंबईतील मतदान लक्षात घेता मुंबईत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुंबईत २५ हजार पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची फौज तैनात करण्यात आली आहे.
कार्यकर्त्यांवर कारवाई
दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर डमी एव्हीएम मशीनवर मतदानाचे प्रात्यक्षिक केल्यावरून पोलिसांनी कारवाई केली आहे. भांडूप येथील मतदानकेंद्रावर हा प्रकार घडला असून यावरून आता आरोप-प्रत्यारोप होत आहेत.
डोंबिवलीत मशीन बंद
मुंबईत मतदानाची चुरस पाहायला मिळत असतानाच डोंबिवलीत एव्हीएम मशीन पडले. यामुळे मतदान केंद्रावर गोंधळाचं वातावरण तयार झाले होते. तर हा प्रकार येथील मंजुळनाथ शाळा मतदान केंद्रावर झाला आहे.
पाचव्या टप्प्यातील मतदारसंघनिहाय टक्केवारी
दिंडोरी- ६.४० टक्के
धुळे- ६.९२ टक्के
नाशिक - ६.४५ टक्के
भिवंडी- ४.८६ टक्के
ठाणे - ५.६७ टक्के
कल्याण - ५.३९ टक्के
पालघर- ७.९५ टक्के
पाचव्या टप्प्यातील मतदारसंघनिहाय टक्केवारी
मुंबई उत्तर - पूर्व - ६.८३ टक्के
मुंबई उत्तर - मध्य - ६.०१ टक्के
मुंबई उत्तर - पश्चिम - ६.८७ टक्के
मुंबई उत्तर - ६.१९ टक्के
मुंबई दक्षिण - ५.३४ टक्के
मुंबई दक्षिण - मध्य- ७.७९ टक्के
कोण कोणाला भिडणार?
नाशिक : हेमंत तुकाराम गोडसे (शिवसेना) विरुद्ध राजाभाऊ वाजे (उद्धव गटातील शिवसेना)
धुळे : भामरे सुभाष रामराव (भाजप) विरुद्ध शोभा दिनेश (काँग्रेस)
दिंडोरी : डॉ.भारती प्रवीण पवार (भाजप) विरोधात भास्कर मुरलीधर भगरे (शरद गट)
पालघर : हेमंत सावरा (भाजप) विरुद्ध भारती कामडी (शिवसेना यूबीटी)
भिवंडी : कपिल मोरेश्वर पाटील (भाजप) विरुद्ध सुरेश म्हात्रे (राष्ट्रवादी)
ठाणे : राजन बाबुराव विचारे (शिवसेना यूबीटी) विरुद्ध नरेश म्हस्के (शिवसेना)
कल्याण : वैशाली दरेकर-राणे (शिवसेना यूबीटी) विरोधात डॉ.श्रीकांत शिंदे (शिवसेना)
कोण कोणाला भिडणार?
मुंबई ईशान्य : संजय दिना पाटील (शिवसेना यूबीटी) विरुद्ध भाजपचे मिहीर कोटेचा
मुंबई उत्तर-पश्चिम : रवींद्र वायकर (शिवसेना) विरुद्ध अमोल कीर्तिकर (शिवसेना यूबीटी)
मुंबई उत्तर मध्य : उज्ज्वल निकम (भाजप) विरोधात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड
मुंबई उत्तर : पीयूष गोयल (भाजप) विरोधात काँग्रेसचे भूषण पाटील
मुंबई दक्षिण : अरविंद सावंत (शिवसेना यूबीटी) विरुद्ध यामिनी जाधव (शिवसेना)
मुंबई दक्षिण मध्य : राहुल शेवाळे (शिवसेना) विरुद्ध अनिल देसाई (शिवसेना यूबीटी)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.