ॲग्रो विशेष

Vasant Panchami, Pandharpur : पंढरपुरात वसंतपंचमीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणीमातेचा लग्नसोहळा

Vitthal-Rukmini Mandir, Pandharpur : माघ शुद्ध पंचमी, अर्थात वसंत पंचमी दिवशी बुधवारी (ता.१४) विठुराया आणि रुक्मिणीमातेचा विवाह सोहळा शेकडो भक्तांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात झाला.

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Pandharpur : पंढरपूर : माघ शुद्ध पंचमी, अर्थात वसंत पंचमी दिवशी बुधवारी (ता.१४) विठुराया आणि रुक्मिणीमातेचा विवाह सोहळा शेकडो भक्तांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात झाला. या विवाहसोहळ्यासाठी साक्षात विठुराया आणि रुक्मिणीमातेसाठी पांढरा शुभ्र पोशाख बनवण्यात आला, तो लक्षवेधी होताच, शिवाय मंदिराला विविध प्रकारच्या सुमारे सहा टन सुगंधी आणि रंगीबेरंगी फुलांनी सजविण्यात आले.

त्यांच्या दरवळाने परिसर उत्साहाने नुसता भारून गेला.
वसंतपंचमी म्हणजे निसर्गाचा उत्सव, निसर्गाचे सौंदर्य खऱ्या अर्थाने वसंत ऋतूत बहरते. वसंत पंचमीच्या मुहूर्तावर दरवर्षी श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचा हा विवाह सोहळा पार पडतो. त्यानुसार हा सोहळा झाला. या वर्षी विठुरायाच्या पोशाखावर प्रभू श्रीराम आणि सीता यांचे आकर्षक चित्र दोरे कामात रेखाटण्यात आले आहेत.

आजच्या मुहूर्तावर श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या मूर्तीवर गुलालाची उधळण करण्यात आलीच, पण आता वसंतपंचमी ते रंगपंचमीपर्यंत देवाला पांढरा शुभ्र पोशाख करून मूर्तीवर गुलालाची उधळण करण्याची परंपरा आहे. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर महाराज, सदस्या शंकुतला नडगिरे, अॅड. माधवी निगडे, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, प्रकाश जवंजाळ, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड उपस्थित होते.

विठ्ठल-रुक्मिणीची पारंपरिक पद्धतीने षोडशोपचारे पूजा करण्यात आली. हा सोहळा एखाद्या शाही सोहळ्याप्रमाणे साजरा केला जातो. त्या निमित्त विठुरायाला पांढऱ्या वस्त्रात सजविण्यात आले, विविध फुलांच्या माळा, पांढरी पगडी, अंगात जरीकाठी रेशमी पोशाख, कमरेला शेला आणि पांढरे धोतर या पोषाखातील नवरदेव अर्थात विठुराया आणि वधू अर्थात रुक्मिणी माताही पांढऱ्या रंगाच्या पैठणीत सजवण्यात आली. डोक्यावर सोन्याचा मुकुट, गळ्यात फुलांच्या दागिन्यांत रुक्मिणीचे रूप अगदीच उठून दिसत होते. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT