almatti dam agrowon
ॲग्रो विशेष

Krishna Flood Water : आलमट्टी, हिप्परगीतील पाणीसाठ्याच्या नियमाचे उल्लंघन : समितीचा आरोप

Almatti Dam : आलमट्टी धरणात ५१५. १६ तर हिप्परगी बंधाऱ्यात ५२१.६० मीटर पाणीसाठा आहे. नियमांचे उल्लंघन करून त्यांनी पाणीसाठा केला आहे.

sandeep Shirguppe

Almatti Dam Water : आलमट्टी धरणात ५१५. १६ तर हिप्परगी बंधाऱ्यात ५२१.६० मीटर पाणीसाठा आहे. नियमांचे उल्लंघन करून त्यांनी पाणीसाठा केला आहे. त्यामुळे आलमट्टी आणि हिप्परगी दोन्ही धरणांतून विसर्ग वाढवावा. अन्यथा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना महापुराचा फटका बसेल, अशी मागणी कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीने केली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी आज (ता.०९) जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

केंद्रीय जल आयोगाच्या शिफारशीनुसार आलमट्टी धरणाची पाणी पातळी १५ जुलैपर्यंत ५१७.११ मीटर व ३० जुलैपर्यंत ५१३.६० मीटर असावे असा नियम आहे. तसेच ३० ऑगस्टपर्यंत ५१७ मीटर इतकी ठेवली पाहिजे. हिप्परगी बंधाऱ्याबाबत ही अशीच सूचना आहे. तसेच हिप्परगी येथील सर्व दरवाजे उघडे ठेवून ३० ऑगस्टपर्यंत उत्तरगीचे पाणी पातळी ५१७ मीटर ठेवण्यात यावी, असेही ठरले होते.

मात्र, यंदा केंद्रीय जल आयोगाच्या तत्त्वांची अंमलबजावणी कर्नाटक जलसंपदा विभागाने सध्या केलेली दिसत नाही. हिप्परगे येथील धरणातील पाणीसाठा करून ठेवण्यावर त्यांचा भर दिसतो आहे. येत्या काही दिवसांत कोयना, वारणा, राधानगरीसह कृष्णा खोऱ्यातील पाणलोट क्षेत्रात पाऊस जोराचा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आलमट्टी व हिप्परगी येथील सध्या असलेला धरणाचा पाणीसाठ्याचा विसर्ग वाढवण्याची गरज आहे. असे असताना आलमट्टी धरणाची आजची पाणी पातळी ५१५.१६ व हिप्परगीची ५२१ मीटर इतकी आहे.

या दोन्ही धरणांतील पाणीसाठा सध्या विसर्ग वाढवून कमी केला नाही, तर येणाऱ्या काळात कृष्णा, कोयना, वारणा, पंचगंगा या नद्यांच्या पाण्याची पातळी वाढून महापुराचा धोका संभावत आहे. त्यामुळे कर्नाटक जलसंपदा विभागाशी तातडीने संपर्क साधून दोन्ही धरणांतील पाणीसाठा कमी करण्यासाठी विसर्ग वाढवण्याबाबत ठोस पाठपुरावा करावा, असेही समितीने या पत्रकात म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांनी कर्नाटक सरकारशी संपर्क साधावा

आलमट्टी धरणातील पाणी पातळी आजची ५१५.१६ मीटर आहे. तेथील पाण्याची आवक रोज सात टीएमसी आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार अजूनही आवक वाढण्याची शक्यता असून, येथे ३१ जुलैच्या आत आलमट्टी धरणातील पाणी पातळी ५१९ मीटर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्नाटक जलसंपदा विभागाने आलमट्टीतील विसर्ग वाढवणे अपेक्षित आहे.

या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कर्नाटक सरकारशी संवाद साधून आलमट्टीचा डिस्चार्ज वाढवावा, अशी मागणीही समितीतर्फे केली जाणार आहे, अशी माहिती धरण अभ्यासक विजयकुमार दिवाण यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election : शेतकरी संघटनांना भुलवतेय आमदारकीची मोहमाया

Maharashtra Assembly Election : पुणे जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाची ससेहोलपट

Sanjay Kulkarni Death : ‘जलसंपदा’ला दिशा देणारे संजय कुलकर्णी यांचे निधन

Rabi Crop Loan : रब्बीसाठी पीक कर्जाचे ६८५ कोटींचे उद्दिष्ट

Maharashtra Weather : मध्य महाराष्ट्रात थंडीची चाहूल

SCROLL FOR NEXT