Sahyadri Farms  Agrowon
ॲग्रो विशेष

Sahyadri Farms : ‘सह्याद्री’च्या शिवारात विनियार्ड अल्ट्रा मॅरेथॉन

Vineyard Ultra Marathon : सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीतर्फे १४ फेब्रुवारीपासून विनियार्ड अल्ट्रा मॅरेथॉनचे आयोजन केले आहे.

Team Agrowon

Nashik News : सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीतर्फे १४ फेब्रुवारीपासून विनियार्ड अल्ट्रा मॅरेथॉनचे आयोजन केले आहे. सर्व गटांसाठी असलेली मॅरेथॉन १८ फेब्रुवारी रोजी सह्याद्री फार्म्स, मोहाडी येथे होणार आहे. ‘सह्याद्री’च्या शेतकऱ्यांच्या पुढाकारातून त्यांच्याच शिवारातून होत असलेली देशातील सर्वात दीर्घ अंतराची एकमेव मॅरॅथॉन म्हणून या मॅरॅथॉनची ओळख बनली आहे.

गेल्या वर्षाच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर यंदा दुसऱ्या वर्षी या मॅरेथॉनचे भव्य आयोजन केले आहे. यंदाही या मॅरेथॉनमध्ये पाच ते ३३८ किलोमीटर पर्यंतचे वेगवेगळे टप्पे ठरविले आहेत. सह्याद्री फार्म्स आणि ब्ल्यू ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या स्पर्धेत १४ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत देशातील तसेच जगातील आंतरराष्ट्रीय धावपटूही सहभागी होतील. हे अल्ट्रा रनर्स ५०, १०० ते ३३८ किलोमीटर पर्यंतचे अंतर वेगवेगळ्या टप्प्यांत पार करतील.

नियमित स्वरूपाची मॅरेथॉन ही १८ फेब्रुवारीला सकाळी ६ वाजता सुरु होईल. त्यामध्ये ५ किमी, १० किमी, २१ किमी आणि ४२ किमी हे महत्त्वाचे टप्पे आहेत. या प्रत्येक टप्प्यात स्पर्धकांना बक्षीसे जिंकण्याची संधी आहे.

यात स्पर्धकांना टी-शर्ट,फळांचे रस,प्रमाणपत्र आणि पदक मिळणार आहे. धावण्याबरोबरच झुंबासारख्या अन्य व्यायाम प्रकारांचाही यात समावेश असेल. स्पर्धेसाठी नाममात्र प्रवेशशुल्क असेल. नागरिकांनी सहभागासाठी सह्याद्री फार्म्सच्या संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे.

सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून,पालखेड धरणाच्या जवळून धाव

मॅरॅथॉनच्या आयोजनात ‘सह्याद्री फार्म्स‘ या शेतकऱ्यांच्या कंपनीला ब्लू ब्रिगेड या प्रथितयश धावपटूंच्या ग्रुपची साथ लाभली आहे. विनियार्ड अल्ट्रा ही विशेष संकल्पना या मॅरॅथॉनच्या आयोजनात आहे. ही मॅरॅथॉन डांबरी सडक आणि शहरातच न होता शेतशिवारातून होत आहे.

द्राक्षपिकांच्या बांधाबांधाने, सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून, पालखेड धरणाच्या जवळून धावणे होणार आहे. द्राक्ष निर्यातीत देशात आघाडीवर असलेल्या सह्याद्री फार्म्समार्फत सामाजिक हिताच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविले जात आहे. अल्ट्रा मॅरॅथॉन हा त्याचाच एक भाग आहे. तरी नागरिकांनी सहभागासाठी सह्याद्री फार्म्सच्या संकेतस्थळावर जास्तीत जास्त नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी संपर्क : 7030962871

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Anti Corruption: विहिरीच्या नोंदीसाठी लाच मागणारा लिपिक ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात 

Farmer Compensation: भरपाईतही नव्या दरामुळे फटका

Leopard In Solapur: बिबट्यांची संख्या पन्नास की शंभर?

White Grub Infestation: हुमणी नियंत्रणासाठी कृषी विभागाचे वरातीमागून घोडे

Onion Farmers: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी

SCROLL FOR NEXT