Crop Compensation Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Compensation : पीक नुकसान भरपाई अनुदानाची अनेक गावांना प्रतीक्षा

Heavy Rainfall Loss : मार्चमध्ये जळगाव तालुक्यासह चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर येथे सर्वाधिक गारपीट झाली. अर्धा तास गारा पडल्या व तासभर सुसाट वारा, पाऊस झाला.

Team Agrowon

Jalgaon News : जिल्ह्यात गेल्या वर्षी फेब्रुवारी ते जूनमध्ये झालेल्या वादळी पाऊस व गारपिटीने चोपडा, जळगाव तालुक्यांतील अनेक शेतकऱ्यांची केळी व रब्बी पिकांचे नुकसान झाले. परंतु नुकसानीसंबंधीच्या मदतीस पात्र असूनही काही गावांमधील शेतकऱ्यांच्याच याद्या तहसीलदार कार्यालयात सादर झाल्या आहेत.

अनेक गावांमध्ये पंचनामे न करता नुकसानच झाले नाही, असे गृहीत धरून नुकसानग्रस्तांच्या याद्याच तहसील कार्यालयात सादर केलेल्या नसल्याचे समोर आले आहे. शेतकरी या अनुदानाची प्रतीक्षा करीत आहेत. मार्चमध्ये जळगाव तालुक्यासह चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर येथे सर्वाधिक गारपीट झाली.

अर्धा तास गारा पडल्या व तासभर सुसाट वारा, पाऊस झाला. तसेच लगतच्या भागातही पाऊस झाला. यात गहू, बाजरी, मका पिकाचे मोठे नुकसान झाले. परंतु नुकसानग्रस्तांच्या यादीत अनेक शेतकऱ्यांचा समावेशच केलेला नसल्याचे समोर आले आहे.

या गावांमधील केळी उत्पादकांना फळ पीकविमा योजनेतून गेल्या वर्षातील गारपीट, वादळात नुकसानीसंबंधीची भरपाई मिळाली नाही. केळी उत्पादकांना किंवा केळी पिकविमा धारकांना वादळ, गारपिटीसंबंधी भरपाई मिळते, पण मका, गहू उत्पादकांना भरपाई का मिळत नाही.

याबाबत प्रशासनाने घोळ केल्याने अडचणी आल्या, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. नुकसान भरपाई न मिळाल्यास तहसीलदार, पालकमंत्री यांना निवेदन सादर करू व घेराव घालू, असा इशारादेखील दिला आहे. चोपडा तालुक्यातही अनेक गावांत फेब्रुवारीत पावसाने हानी झाली. प्रशासनाच्या कुचराईमुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Kisan 21 Installment : पीएम किसानच्या २१ हप्त्याची हप्त्याची तारीख ठरली; नोंदणीसाठी कृषी मंत्रालयाचे आवाहन

Sugarcane Rate Protest: कर्नाटकातील मुधोळमध्ये ऊसदर आंदोलनाचा भडका

Micro Irrigation: ‘सूक्ष्म सिंचन’साठी इंदापुरात मोहीम

Crop Processing Industry: पारंपरिक शेतीबरोबरच प्रक्रिया उद्योगावर भर द्यावा: पाटील

Bihar Assembly Election: बिहार विधानसभा निवडणुकीच्या विजयाचे श्रेय लाडक्या बहि‍णींना

SCROLL FOR NEXT