Crop Damage Compensation : कालवा फुटीच्या नुकसानीबाबत जलसंपदामंत्र्यांकडून पुन्हा आश्‍वासन

Ujani Canal Burst : दोन वर्षांपूर्वी २९ जानेवारी २०२३ रोजी पाटकुल (ता. मोहोळ) हद्दीत साखळी क्रमांक ११२/६५० या ठिकाणी उजनीचा डावा कालवा अचानक फुटला. कालवा फुटल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले.
Ujani Canal
Ujani CanalAgrowon
Published on
Updated on

Solapur News : दोन वर्षांपूर्वी जानेवारीमध्ये उजनीचा डावा कालवा फुटून पाटकूल आणि परिसरातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पैसे द्यावेत, अशी मागणी मोहोळचे आमदार राजू खरे यांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत केल्यानंतर येत्या आठ दिवसांत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पैसे मिळतील, अशी ग्वाही जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.

या आधीही या प्रकरणाचा पाठपुरावा झाला आहे, पण पुढे काहीच झाले नाही, पण आता पुन्हा एकदा आश्‍वासन मिळाल्याने नुकसानग्रस्त १५४ शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचा प्रश्‍न मार्गी लागणार का, हा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

Ujani Canal
Tembhu canal burst : टेंभू योजनेचा कालवा फुटला; लाखो लिटर पाणी वाया

दोन वर्षांपूर्वी २९ जानेवारी २०२३ रोजी पाटकुल (ता. मोहोळ) हद्दीत साखळी क्रमांक ११२/६५० या ठिकाणी उजनीचा डावा कालवा अचानक फुटला. कालवा फुटल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या. अनेकांच्या विहिरी, बोअर गाळाने भरली, ठिबक सिंचन इलेक्ट्रिक मोटारी वाहून गेल्या, तर एका शेतकऱ्याचे घर पडले.

त्याशिवाय द्राक्ष, डाळिंब आदींसह अन्य फळबागा व पिकेही वाहून गेली. त्यात शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. केवळ अर्ध्या तासाच्या कालावधीत होत्याचे नव्हते झाले, दरम्यान महसूल प्रशासनाने तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी तातडीने पंचनामे करून तहसीलदार यांना अहवाल सादर केला.

Ujani Canal
Dhom Canal Burst : धोमच्या डाव्या कालव्याला भगदाड पडल्याने नुकसान

तहसीलदारांनी तो अहवाल जलसंपदा विभागाकडे पाठविला. घटना घडल्या नंतर अनेक आमदार, खासदार, विविध वरिष्ठ शासकीय अधिकारी, कारखान्यांचे अध्यक्ष यांनी भेटी देऊन नुकसान भरपाई मिळवून देण्याबाबत भरभरून आश्‍वासने दिली, मात्र पुढे काहीच झाले नाही, तब्बल दोन वर्षे हा प्रश्‍न रखडला होता.

दरम्यान, आमदार खरे यांनी नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईबाबत आवाज उठविला, त्यामुळे जलसंपदामंत्री विखे-पाटील यांनी येत्या आठ दिवसांत पैसे देण्याची व्यवस्था करण्याचे आश्‍वासन दिले. त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे आता मदतीकडे लागले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com