Cooperative Societies Elections agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Politics : गावपातळीवरील राजकारण तापणार, कोल्हापुरातील २ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार

Cooperative Societies Election : मागच्या वर्षभरापासून प्रलंबीत राहिलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी कोल्हापूर जिल्ह्यात पुढच्या दोन महिन्यात सुरू होणार आहे.

sandeep Shirguppe

Cooperative Societies Election Kolhapur : मागच्या वर्षभरापासून प्रलंबीत राहिलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी कोल्हापूर जिल्ह्यात पुढच्या दोन महिन्यात सुरू होणार आहे. पुढील १५ दिवसांत याबाबत जिल्हा उपनिबंधकांकडे सूचना येणार असल्याची माहिती समोर आली आहे. जिल्ह्यातील लहान, मोठ्या अशा २ हजार २०० संस्थाचा निवडणुक कार्यक्रम लागणार आहे. यामध्ये सर्वाधिक १६७० दूध व मत्स्य संस्थांचा समावेश आहे.

लोकसभेनंतर विधानसभेची आचारसंहिता लागल्याने सहकारी संस्थाच्या निवडणुका लांबणीवर पडल्या. यामध्ये शाहूवाडी तालुक्यातील सोनवडे-बांबवडे येथील उदयसिंगराव गायकवाड साखर कारखाना तर भुदरगड तालुक्यातील तांबाळे येथील इंदिरा महिला सहकारी साखर कारखान्यांची प्रक्रिया सुरू होणार आहे. याचबरोबर २ हजार २१५ संस्थांपैकी ५४५ संस्थांच्या निवडणुकात वर्षभरात पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित १६७० संस्थांची प्रक्रिया आता राबवली जाणार आहे.

सहकारी संस्थांप्रमाणेच महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुकाही होण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे पुढे ढकलेल्या अनेक निवडणुका प्रलंबीत आहेत. दरम्यान चार दिवसांपूर्वीच सहकारी निवडणूक प्राधिकरणाने राज्य शासनाकडे सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी परवानगी मागितली आहे. त्यामुळे नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर लगेचच ही प्रक्रिया सुरू होऊ शकते.

ग्रामीण भागात वातावरण तापणार

सहकारी संस्थाच्या निवडणुकांवर गावपातळीवरील राजकारण ठरत असते. ज्या गटाची सहकारी संस्थेवर पकड मजबूत असते त्या गटाचा गावपातळीवर जोर असतो. यामुळे दूध, विकास सेवा संस्था, पतसंस्थांच्या निवडणूका ताकदीने लढविल्या जातात. ग्रामपंचायतीप्रमाणे या संस्थांच्या निवडणुकांमध्ये इर्षा पहावयास मिळत असते. यामुळे पुढच्या ३ महिन्यात ग्रामीण भागात निवडणुकांचा धुरळा पहायला मिळणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT