Maharashtra Politics : मुख्यमंत्री पदाची घोषणा लांबणीवर; मुंबईतील बैठक रद्द, एकनाथ शिंदे साताऱ्याला रवाना

Eknath Shinde : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? हे समजण्यासाठी आणखी २ दिवस वाट पाहावी लागणार असे महायुतीच्या हालचालीवरून दिसून येत आहे.
Maharashtra Politics News
Maharashtra Politics Newsagrowon
Published on
Updated on

Maharashtra Politics CM Post : महाराष्ट्रात महायुतीला स्पष्ट बहुमत येऊनही मुख्यमंत्री कोण होणार यावरून अद्यापही खलबते सुरू आहेत. केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी महायुतीमधील नेत्यांची गुरूवारी (ता.२८) रात्री उशिरा बैठक झाली. या बैठकीस राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार अजित पवार, आमदार देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या बैठकीत सरकार स्थापनेबाबत शाह यांनी सूचना दिल्याचे बोलले जाते. यानंतर शुक्रवारी (ता.२९) मुंबईत महायुतीची बैठक होणार होती. पण, अचानक ही बैठक रद्द करण्यात आली आहे.

दरम्यान महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? हे समजण्यासाठी आणखी २ दिवस वाट पाहावी लागणार असे महायुतीच्या हालचालीवरून दिसून येत आहे. आज (ता.२९) शुक्रवारी मुंबईमधील बैठकीत मुख्यमंत्रि‍पदाचे नाव निश्चित होण्याची शक्यता होती. त्याशिवाय कोणाला कोणतं मंत्रीपद दिले जाणार? हेही निश्चित होणार होतं. परंतु बैठकी लांबणीवर गेल्याने पुन्हा संदिग्धता निर्माण झाली आहे.

Maharashtra Politics News
Karjmafi Maharashtra : शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, सोयाबीनला ६ हजार रुपये दर द्या; महायुती सरकार स्थापन कधी करणार?

एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी गुरूवारी (ता.२८) रात्री अमित शाह यांच्याकडे प्रस्ताव दिले होते. त्या प्रस्तावावर विचार करून अमित शाह हे या दोन्ही नेत्यांना फोन करणार होते. त्या फोन नंतर राज्यातील तीन नेते एकत्र बसून निर्णय घेणार होते. मात्र अद्याप फोन न आल्याने बैठक पुढे ढकलण्यात आल्याचे बोलले जात आहे. आता ही बैठक २ दिवसानंतर होईल अशी चर्चा आहे.

महत्त्वाची खाती पदरात पाडून घेण्यासाठी येत्या २ दिवसात अनेक आमदार, नेते मुंबईत वरिष्ठांची भेट घेण्याची शक्यता आहे. महत्त्वाच्या मंत्रिपदासाठी महायुतीमधील अनेकांचे लॉबिंग सुरू झालेय. मुख्यमंत्री पद सोडून इतर मंत्रिपदं मिळावी यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत.

एकनाथ शिंदे मूळगावी जाणार

महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आला असताना अचानक राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या मूळगाव देरे सातारा येथे जाणार असल्याची माहीती समोर आली आहे. दरम्यान एकनाथ शिंदे भाजपवर नाराज असल्याचेही बोलले जात आहे. पुढील दोन दिवस महाराष्ट्रात महायुतीच्या बैठका होणार नाहीत अशीही माहिती समोर आली आहे.

दोन दिवसात बैठक शक्य : खासदार राहुल शेवाळे

एकनाथ शिंदे यांचा आदर राखून पुढचे निर्णय घेतले जातील. आज महायुतीची बैठक होती मात्र भाजपच्या विधिमंडळ दलाची बैठक झाल्यानंतर ही बैठक २ दिवसात होईल. विधानसभेची निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढवली आणि त्याला यश आलं. त्यांच्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीच ते यश आहे. राज्यातील जनतेचा आदर ठेवून त्यांचा सन्मान केला जाईल असे शेवाळे म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com