Rural Culture Agrowon
ॲग्रो विशेष

Rural Culture : शिवारदैवतं झाकोळून गेली आहेत

Rural Story : ऑक्टोबर हिटमुळे साप थंड जागी जाऊन पडतात. पावसामुळे गेले पंधरा दिवस झाले मका कापणीचं काम लांबलं आहे.

Team Agrowon

सोमनाथ कन्नर

Agriculture : ऑक्टोबर हिटमुळे साप थंड जागी जाऊन पडतात. पावसामुळे गेले पंधरा दिवस झाले मका कापणीचं काम लांबलं आहे. कडबा जास्त दिवस कापून ठेवल्यास त्याखाली साप जाऊन बसतात. आतापर्यंत मण्यार, घोणस, धामण आणि एक केवड्या असे चार साप आढळून आले.

शेतात साप दिसणं, एखादा अपघात घडणं असं काही झालं की शेताचे रक्षण करणाऱ्या शिवारदेवतांची मानमनता करतात. आमच्या शिवारातल्या एका देवाला अंडं आणि सरकी वाहतात. दिवा लावला जातो. रक्षण करण्याची विनंती केली जाते.

आजकाल पुराणदैवतांच्या झगमगाटात ही शिवारदैवतं झाकोळून गेली आहेत. यांचा ना कुठला उत्सव असतो ना यांच्यापुढे त्यांच्या रुपाचं गुणगान करणाऱ्या आरत्या ओवाळल्या जात ना मखर सजवला जातो. हे बिचारे वर्षानुवर्षे बांधावर ओबडधोबड दगडाच्या रूपात बसलेले असतात. वर्ष दोन वर्षातून कधीतरी एकदा लावलेल्या फिकट शेंदरातून यांचं अस्तित्व तेवढं जाणवतं.

यांच्या भरवशावर कुणबी शेती करतो. यांच्याच आसऱ्याने भयाण रानमाळावर एकटीदुकटी बाई निर्धास्त वावरते. यांच्या सोबतीने गुराखी गुरं चारतो. रात्रीला खळ्यावर जागलीसाठी गेलेल्या शेतकऱ्याला यांचीच कम्पनी असते. यांच्या भरवश्यावर लेकरू झाडाच्या फांदीला बांधलेल्या झोक्यात टाकून माऊल्या कामात मग्न होतात.

टॉम हँक्सच्या कास्ट अवे चित्रपटातील विल्सन या हॉलिबॉलप्रमाणेच या दैवतांच्या आधाराने रानावनात लोक वर्षानुवर्षे सर्व्हाइव्ह करत आहेत.

निसर्गपूजा करणाऱ्या माणसाने पुढं निसर्गदेवतेला असं शिवारदैवतांमध्ये रूपांतरित केलं. या दैवतांना कुठलाही मध्यस्ती नसतो हे विशेष. सात्विकच आहार पाहिजे, तो असाच शिजवलेला पाहिजे वगैरे असले या दैवतांचे चाळे नसतात. तुम्ही खाता तेच आम्हाला द्या, एवढा सोपा यांचा नेवैद्य असतो. ही दैवतं खाण्यापिण्यावरून कुणाला वेठीस धरत नाहीत.

आपल्या अस्तित्वाचं अस्सल प्रतिबिंब झळकणाऱ्या या दैवतांना झाकून ठेवत बहुजन आजकाल ब्राह्मणी दैवतांच्या भजनी लागण्यात धन्यता मानत आहेत. हा लोकचांगेपणाच बहुजनांना कायम दुय्यम ठेवत गेला आहे. स्वतःच्या अस्तित्वाचा सन्मान करणं जमलं पाहिजे. बाकी सगळं चांगभलं होत असतं.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Productivity : शासकीय खरेदीसाठी सोयाबीनची उत्पादकता जाहीर

Vidhansabha Election Result 2024 : लातूर,धाराशिवकरांची महायुतीला पसंती

Gokul Milk : कोल्हापुरात महाडिक पॅटर्न; आता ‘गोकुळ’ निशाण्यावर

Jalgaon Assembly Election Result 2024 : खानदेशात महायुतीची मुसंडी; काँग्रेसचे दिग्गज पराभूत

Rohit Patil NCP-SP : राज्यातला सर्वात तरूण आमदार राष्ट्रवादीचा; वय अवघे...

SCROLL FOR NEXT