Vilas Co-Operative Sugar Mill Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Crushing Target : विलास साखर कारखान्याकडून नऊ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट

Sugarcane Season 2025 : मागील गळीत हंगामाप्रमाणेच येणारा हंगामही यशस्वी करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. हंगामासाठी कारखाना कार्यक्षेत्रात पुरेसा ऊस उपलब्ध आहे.

Team Agrowon

Latur News : निवळी (ता. लातूर) येथील विलास सहकारी साखर कारखान्याकडून येत्या गळीत हंगामाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. कारखान्याकडून या हंगामात नऊ लाख मेट्रीक टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती कारखान्याच्या अध्यक्षा वैशाली देशमुख यांनी दिली. हंगामातील तयारीत मिल रोलरपूजन प्रसंगी त्या बोलत होत्या.

मागील गळीत हंगामाप्रमाणेच येणारा हंगामही यशस्वी करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. हंगामासाठी कारखाना कार्यक्षेत्रात पुरेसा ऊस उपलब्ध आहे. सभासदांच्या चौदा हजार ८९३ हेक्टर तर बिगर सभासदांच्या पाच हजार ७९० हेक्टर अशा एकूण वीस हजार ६८७ हेक्टर उसाची नोंदणी झाली आहे.

कारखान्याने ऊस तोडणीचे योग्य नियोजन केले असून, या हंगामात जास्तीत जास्त ऊस हा तोडणीयंत्राद्वारे तोडणी करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात कारखान्यामार्फत १५ हार्वेस्टर खरेदी केले जाणार आहेत. भविष्यात

उसाची उपलब्धता पाहता, शंभर टक्के ऊस तोडणी यंत्राद्वारे केल्यानंतर उसाचे गाळप करण्यासाठी आवश्यक असणारी मशिनरी बसविण्यात येत आहे. तांत्रिक कारणांमुळे कारखाना बंद तास कमी राहतील, याची दक्षता घेतली जाणार असल्याचे कार्यकारी संचालक संजीव देसाई यांनी सांगितले.

या वेळी कारखान्याचे उपाध्यक्ष माजी आमदार वैजनाथ शिंदे, विजय देशमुख, डॉ. सारीका देशमुख, रवींद्र काळे, संचालक सर्वश्री रणजित पाटील, अनंत बारबोले, रसूल पटेल, तात्यासाहेब पालकर, गोवर्धन मोरे, हणमंत पवार, नरसिंग बुलबुले, नेताजी साळुंके, नितीन पाटील, रामराव साळुंके, अमृत जाधव, सतीश शिंदे, दीपक बनसोडे, लताबाई देशमुख, श्याम बरुरे, सुभाष माने, रमेश देशमुख उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Lumpy Skin : लातूर जिल्ह्यात बारा गावांत ‘लम्पी’चा प्रादुर्भाव

Warna Dam : वारणा धरणपाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढला

Radhanagari Dam : कोल्हापुरात जोरदार पाऊस,'राधानगरी'चे चार दरवाजे उघडले

Tur Crop : खानदेशात तूर पीक जोमात

E-Peek Pahani : शेतकऱ्यांचा ई-पीक पाहणीला कमी प्रतिसाद

SCROLL FOR NEXT