Sugarcane FRP Rate agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane FRP : उसाला बाजारभाव देण्यात विघ्नहर कमी पडणार नाही

Sugarcane Season : उसाला जास्तीत जास्त बाजारभाव देण्याची विघ्नहर कारखान्याची परंपरा आहे.

Team Agrowon

Pune News : ‘‘उसाला जास्तीत जास्त बाजारभाव देण्याची विघ्नहर कारखान्याची परंपरा आहे. भविष्यकाळातदेखील ऊसाचा भाव कमी असणार नाही,’’ अशी ग्वाही कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी बस्ती-सावरगांव (ता. जुन्नर) येथे बोलताना दिली.

विघ्नहर कारखान्याच्या वतीने मंगळवारी (ता. २६) आयोजित शेतकरी मेळाव्यात ऊस उत्पादकांना मार्गदर्शन करताना शेरकर हे बोलत होते. यावेळी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे शास्त्रज्ञ डॉ. रमेश हापसे, उपाध्यक्ष अशोक घोलप, कार्यकारी संचालक भास्कर घुले, सेक्रेटरी अरुण थोरवे, शेतकी अधिकारी सचिन पाटील, संदीप मोरडे, माजी जिल्हा परिषद सदस्य शरद लेंडे, गुलाब पारखे, बाजार समितीचे उपसभापती प्रकाश ताजणे, बाजीराव ढोले, सोपान जाधव,

बाबा शेरकर, उत्तम काशीद, अरुण काळे, प्रदीप थोरवे, वैभव कोरडे, महिला काँग्रेसच्या अर्चना भुजबळ, वैशाली थोरवे, मंदाकिनी मोरडे, संगीता नायकोडी, ज्योती गाढवे, सुवर्णा धोंडकर, वैशाली तांबोळी, मोहिनी घुले, दीपिका उंडे, अविनाश पुंडे, विष्णू थोरवे, अविनाश थोरवे, दगडू ढोमसे, जितेंद्र बिडवई, योगेश डोके, प्रकाश गिदे यांच्यासह विघ्नहरचे आजी-माजी संचालक, सावरगाव परिसरातील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

मेळाव्याच्या सुरुवातीला गणेश पूजन व दिवंगत निवृत्तिशेठ यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. शरद लेंडे, मंगेश काकडे यांनीही मनोगत व्यक्त केले. शेतकी अधिकारी संदीप जाधव व प्रवीण भगत यांनी सूत्रसंचालन केले. अशोक घोलप यांनी आभार मानले.

गाळप क्षमता वाढणार

विघ्नहर कारखाना पुढील हंगामापासून प्रतिदिन पाच हजार ऐवजी ७५०० मेट्रिक टन गाळप क्षमता करणार असून संचालक मंडळाचे कमी दिवसात जास्त ऊस गाळप करण्याचे धोरण आहे. कारखान्याकडून ऊस उत्पादकांच्या बांधावर जाऊन ऊस उत्पादकता वाढीसाठी मार्गदर्शन करण्यात येत आहे, असे सत्यशील शेरकर यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tractor Heating in Summer: उन्हाळ्यात ट्रॅक्टर गरम होतोय? देखभालीच्या सोप्या ७ टिप्स!

Power Supply Issues: धान पिकाला विजेचा फटका

Weekly Market Issue: धाड आठवडी बाजार प्रश्नावर आंदोलनानंतर प्रशासनाचे आश्वासन

Flood Fishermen Compensation: पूरग्रस्त मत्स्य व्यावसायिकांना चार कोटींची भरपाई मंजूर

CPIM Protest: बीड जिल्ह्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची निदर्शने

SCROLL FOR NEXT