Tiger Agrowon
ॲग्रो विशेष

Vidarbha Tiger Crisis: देशातील वाघांचे सर्वाधिक मृत्यू विदर्भात

Maharashtra Tigers: गेल्या पाच वर्षांत देशभरात ६२८ वाघांचे मृत्यू झाले असून, त्यातील १६० मृत्यू केवळ महाराष्ट्रातील, विशेषतः विदर्भात झाल्याची माहिती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर करण्यात आली आहे.

Team Agrowon

Nagpur News: देशभरात गेल्या पाच वर्षांत ६२८ वाघांचे मृत्यू झालेत. त्यातील सुमारे २५ टक्के म्हणजेच १६० वाघ राज्यातील मुख्यत्वे विदर्भातील होते, अशी माहिती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर करण्यात आली आहे.

डिसेंबर महिन्यात उमरेड कऱ्हांडला व्याघ्र प्रकल्पात पर्यटनासाठी वाघांना अडविण्यात आले होते. याची गंभीर दखल घेत न्यायालयाने स्वत:हून घेत जनहित याचिका दाखल करवून घेतली आहे. या प्रकरणी न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली.

न्यायालयीन मित्रांनी या प्रकरणाची व्याप्ती वाढवित न्यायालयापुढे वाघांबाबत ही माहिती सादर केली. वाघांच्या शिकारीबाबतही त्यांनी बरीच माहिती न्यायालयापुढे सादर केली. त्यानुसार, शिकारींचा मुद्दा हा राज्यापुरता मर्यादित नाही.

यात मध्य प्रदेशातील काही जणांवर संशय तर आहेच. मात्र, यातील एक सहआरोपी मेघालय येथील आहे. इतकेच नाही तर हे धागेदोरे म्यानमारच्या ‘बर्मा’पर्यंत पोहोचले आहेत, अशीही माहिती वोडीतेल यांनी दिली.

यावर न्यायालयाने या प्रकरणी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण, केंद्र सरकारचा वने व पर्यावरण विभाग आणि वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरो यांना प्रतिवादी करण्याचे आदेश दिले. न्यायालयीन मित्र म्हणून ॲड. सुधीर वॉडीतेल यांनी बाजू मांडली. पेंच व्याघ्र प्रकल्पात अवैध मासेमारी सुरू असून येथील स्थानिकांनी वन विभागाच्या गस्त पथकावर बॉम्ब हल्ला केला होता. यातील आरोपींमध्ये मध्य प्रदेशातील काही रहिवासीयांचासुद्धा समावेश होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Accident Scheme: तीस दिवसांच्या अटीऐवजी १२० दिवसांच्या मुदतीचा प्रस्ताव

Godavari Flood Management : गोदावरी पूरप्रश्नी कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर

Green Monsoon Drive : ‘ग्रीन मॉन्सून’ अंतर्गत दऱ्याई माता परिसरात ५ हजार देशी वृक्षांचे रोपण

Jalyukt Shivar Abhiyan: जलयुक्त शिवार योजनेची ६२२ कामे अंतिम टप्प्यात

District Central Bank : जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने दिली ४५८१ सभासदांची यादी

SCROLL FOR NEXT