Crop Compensation Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Compensation : वादळामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई अल्प

Crop Insurance : जिल्ह्यात वादळी गत काळात पावसासह गारपिटीत मोठ्या क्षेत्रातील केळी व इतर पिके, बागांची हानी विविध भागांत मागील कालावधीत झाली आहे.

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : जळगाव ः जिल्ह्यात वादळी गत काळात पावसासह गारपिटीत मोठ्या क्षेत्रातील केळी व इतर पिके, बागांची हानी विविध भागांत मागील कालावधीत झाली आहे. परंतु भरपाई देताना विमा कंपनीने केळी विमाधारकांच्या तोंडाला पाने पुसल्याची स्थिती आहे.

ही भरपाई किंवा विमा योजनेतील वादळात नुकसानीचे परतावे उशिराने शासनाकडून मिळाले. केळी उत्पादकदेखील वादळात नुकसान भरपाईच्या वितरणाबाबत किंवा कमी नुकसान भरपाई दिल्याबाबत नाराज आहेत. विमा कंपनीच्या आडमुठेपणामुळे अनेक जण नुकसानीपासून वंचितही आहेत. २०२३-२४ मध्ये फळ पीकविमा योजनेत जिल्ह्यातील सुमारे ५२ हजारांवर शेतकरी सहभागी झाले.

या शेतकऱ्यांनी केळी पिकासाठी विमा संरक्षण घेतले. विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांच्या केळीची जळगाव, यावल, रावेर, मुक्ताईनगर आदी भागात हानी झाली. विमा योजनेतून नुकसानीची पातळी, स्थिती लक्षात घेऊन भरपाई दिली जाते. ही भरपाई कमाल ७५ हजार रुपये एवढी प्रतिहेक्टरी मिळते. त्यात जिल्ह्यात वादळात केळीची ३० ते ८० टक्के एवढे नुकसान झाले.

रावेरातील उत्तर, पूर्व व मध्य भागात मोठी हानी झाली होती. तसेच मुक्ताईनगर, जळगाव, यावल, चोपडा भागातही केळीचे वादळात नुकसान झाले. परंतु परतावे किंवा भरपाई देतना अनेक विमाधारकांना हेक्टरी अडीच हजार रुपयेच मिळाल्याची स्थिती आहे. काही भागांत हे परतावेच कंपनीने नुकसान झालेले नसल्याचे सांगून नाकारले.

सुमारे पाच हजार तक्रारी वादळात नुकसानीसंबंधी विमा कंपनीकडे प्राप्त झाल्या होत्या. यातील किती तक्रारींवर कार्यवाही झाली, किती शेतकऱ्यांना परतावे मिळाले, असा प्रश्न आता शेतकरी विचारत आहेत. प्रशासन, शासनाने याबाबत लक्ष देऊन कार्यवाही करावी, अशी मागणी केली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune Rainfall: पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

MKCL Investment: ‘एमकेसीएल’ने सरकारमध्ये गुंतवणूक करावी; शरद पवार यांची अपेक्षा

Market License Cancellation: पणन संचालकांचा खासगी बाजारांवर कारवाईचा धडाका; ‘रामेश्वर, ‘कसमादे’, ‘जय गजानन’ बाजारांचे परवाने रद्द

Indigenous Livestock Breeds: सोळा नव्या देशी पशुजातींना मान्यता

Agro-Service Federation's Protest: प्रस्तावित आकृतिबंधाविरोधात कृषी सेवा महासंघाचे आंदोलन

SCROLL FOR NEXT