Satara DCC Bank : बँकेच्या पाच लाख खातेदारांना विमा संरक्षण : नितीन पाटील

Insurance Cover : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत दोन लाख ९६ हजार ८६४ खातेदारांना सहभागी करून घेतले आहे.
Satara DCC Bank
Satara DCC Bank AGrowon
Published on
Updated on

Satara News : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत दोन लाख ९६ हजार ८६४ खातेदारांना सहभागी करून घेतले आहे. त्यांच्या हप्त्याच्या रकमेसाठी बँकेने स्वनफ्यातून ५९.३७ लाखांची तरतूद केली आहे.

या योजनेत बँकेच्या एकूण पाच लाख खातेदारांना मोफत विमा संरक्षण उपलब्ध झाले आहे, अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष खासदार नितीन पाटील यांनी आज वार्षिक सर्वसाधारण सभेत दिली. दरम्यान, अहवाल वर्षात सभासदांना १२ टक्के लाभांश जाहीर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Satara DCC Bank
Satara DCC Bank : साताऱ्यातील विकास सोसायट्या १५० विविध व्यवसाय करणार

जिल्हा बँकेची वार्षिक सभा बँकेचे अध्यक्ष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बँकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात शुक्रवारी झाली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी बँकेचे ज्येष्ठ संचालक रामराजे नाईक निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, बाळासाहेब पाटील, प्रभाकर घार्गे, दत्तात्रय ढमाळ, राजेंद्र राजपुरे, प्रदीप विधाते, सत्यजित पाटणकर, रामराव लेंभे, सुनील खत्री, ज्ञानदेव रांजणे, शेखर गोरे, सुरेश सावंत, लहुराज जाधव, कांचन साळुंखे, ऋतुजा पाटील, जितेंद्र चौधरी, संग्रामसिंह जाधव, तानाजीराव जाधव, राजीव गाढवे, राजेंद्र भिलारे उपस्थित होते.

Satara DCC Bank
Satara DCC Bank : सातारा जिल्हा बॅंकेची सामान्य कर्ज मर्यादा वाढणार

अध्यक्ष पाटील म्हणाले, की बँकेचा एकूण मिश्र व्यवसाय १७ हजार ८०० कोटींपेक्षा अधिक झाला असून, २०२३-२४ अखेर उच्चांकी ढोबळ नफा १७९ कोटी ४१ लाख आणि निव्वळ नफा रुपये ८५ कोटी आहे.

बाळासाहेब पाटील म्हणाले, की बँकेने अमृतमहोत्सवी वर्ष बँकेने पूर्ण केले आहे. महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेचे काही शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत. ते ही लवकरच मिळतील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com